आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Targeted Priyanka Chopra And Said, 'What If She Is Not In Film, She Can Even Help In Promotion'

भारत : सलमानने साधला प्रियांका चोप्रावर निशाणा, म्हणाला - 'चित्रपटात नसली म्हणून काय झाले, प्रमोशनमध्ये तर मदत करूच शकते ना' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खान सध्या आपला चित्रपट 'भारत'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच जेव्हा तो लीड एक्ट्रेस कतरिना कैफसोबत एका वेबसाइटवर फिल्मचे प्रमोशन करत आहे मात्र त्यादरम्यान प्रियांका चोप्रावर निशाणा साधायला मात्र विसरला नाही. झाले असे की, या चित्रपटात आधी प्रियांका मुख्य भूमिका साकारणार नाही. पण मागच्यावर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत साखरपुडा करण्यासाठी तिने हे प्रोजेक्ट सोडले आणि तिच्या जागी कतरिना कैफला निवडले गेले.  

 

सलमान बोले - प्रियांका करू शकते प्रमोशनमध्ये मदत... 
इंटरव्यूदरम्यान कतरिना कैफने फिल्ममध्ये आपल्या रोलबद्दल सांगितले. जशी ती म्हणाली की, जेव्हा हे पात्र लिहिले जात होते तेव्हा मी तिथे कुठेच नव्हते. यावर सलमानने टोकले आणि आणि म्हणाला तिथे प्रियांका होती. सलमान म्हणाला, "ती (प्रियांका) फिल्ममध्ये नाहीये, पण याच्या प्रमोशनमध्ये मदत करू शकते. कारण हे तर तुम्हालाही माहित आहे की, तिला स्क्रिप्ट खूप आवडली होती."

 

प्रियंकाने भारत ऐवजी यूएसला निवडले  : सलमान... 
सलमानने टोमणे मारत सांगितले, "प्रियंकाने भारत ऐवजी यूएसला निवडले निकसाठी. तिने संपूर्ण आयुष्य खूप मेहनत केली आहे आणि जेव्हा तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी फिल्म मिळाली तर तिने ऑफर ठोकरली आणि लग्न केले. सलाम आहे तिला. सामान्यतः महिला अशा फिल्मसाठी पतीला सोडून देतात."

 

सलमान म्हणाला - कतरिनाला मिळेल नॅशनल अवॉर्ड... 
सलमान खानने इंटरव्यूदरम्यान सांगितले की, भारतसाठी कतरिना कैफला नॅशनल अवॉर्ड मिळेल. त्यांच्यानुसार, त्याला नाही वाटत की, यापेक्षा मोठी प्रेरणादायक कोणती फिल्म, आपल्या मातीशी जोडलेली फिल्म पुढील काही काळात येईल. तो हेही म्हणाला की, कतरिनाने फिल्ममध्ये अप्रतिम काम केले आहे आणि यासाठी तिला एक हजार टक्के नॅशनल अवॉर्ड मिळेल. 

 

'फिल्म चालेल की, नाही हे सर्व प्रेक्षकांवर अवलंबून आहे...'
सलमानचे म्हणणे आहे की, फिल्म चालेल की, नाही हे सर्व ऑडियंसवर अवलंबून आहे. पण त्याला नाही वाटत की, लोका फिल्ममुळे निराशा होईल. अली अब्बास जफरच्या डायरेक्शनमध्ये बनलेली ही फिल्म 5 जूनला रिलीज होणार आहे. फिल्ममध्ये सुनील ग्रोवर, दिशा पाटनी आणि जॅकी श्रॉफचाही महत्वाचा रोल आहे.