आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वॉन्टेड'च्या सिक्वेलमध्ये सलमान राहणारच, पण बोनी जाणार बाहेर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खान आणि प्रभू देवाने नुकतेच 'दबंग ३' चित्रपटावर मिळून काम केले आहे. आता दोघेही आपला २००९ मध्ये रिलीज झालेला हिट चित्रपट 'वॉन्टेड'च्या सिक्वेलवर पुन्हा एकत्र काम करतील. तथापि, चित्रपटाचे निर्माते असलेेले बोनी कपूर या वेळी या सिक्वेलमध्ये काम करणार नाहीत.

पुढे येत आहे हे कारण
सूूत्राने सांगितले, सलमान 'वॉन्टेड'च्या सिक्वलवर काम करण्यासाठी उत्सुक आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला रिलीज होईल. तथापि, तो कोणत्याही परिस्थितीत बोनीसोबत काम करण्यास तयार नाही. यामागे त्याची वैयक्तिक कारणे आहेत. असे म्हटले जाते की, यामागे एकच कारण आहे. ते म्हणजे बोनी यांचा मुलगा अर्जुन कपूर सलमानची माजी वहिनी मलायका अरोराला डेट करत आहे.

स्वत: करणार निर्मिती
बोनी या चित्रपटात काम करणार नाहीत. अशा स्थितीत सलमानने या चित्रपटाची कमान स्वत: सांभाळली आहे. आता तो या चित्रपटाची निर्मिती आपले बॅनर सलमान खान फिल्मसखाली करणार आहे. सलमानसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. कारण याच चित्रपटाने २००९ मध्ये त्याच्या बुडत्या करिअरला आधार दिला होता.
 "राधे' चित्रपटाबाबत अशी चर्चा आहे की, यात सलमानची नायिका दिशा पाटणी असेल. यापूर्वी चर्चा होती की, यामध्ये त्याची नायिका म्हणून अनुष्का शर्मा हिची निवड करण्यात आली होती.

बोनी करणार नाहीत कायदेशीर कारवाई
बाेनी यांच्या जवळचे लोक म्हणतात, सलमानला ते आनंदाने सिक्वेल बनवण्याची परवानगी देतील. लोक म्हणतात, 'बोनी खूप दयाळू आहेत. सलमानला केवळ एकदा बोनींना याबाबत सांगावे लागेल. आम्हाला विश्वास आहे की, ते सलमानला हा सिक्वेल बनवण्याची परवानगी नक्की देतील. बोनी कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यास तयार नाहीत.'

सलमानच्या आगामी चित्रपटांची स्थिती...
सलमान खानच्या आगामी चित्रपटांबाबत अनेक प्रकारच्या चर्चा आहेत. यामुळे त्याचे चाहते खूप संभ्रमात आहेत. इथे आम्ही त्याच्या आगामी चित्रपटांची योग्य स्थिती सांगत आहोत...
- दबंग ३ - २० डिसेंबर २०१९
- वेटेरनचा रिमेक (राधे) - पुढच्या वर्षी तयार होईल.
- किक २ - पुढच्या वर्षी सुरू होईल शूटिंग
- वॉन्टेड २ - ईद २०२०
 

बातम्या आणखी आहेत...