आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman's 31 Years In Industry On The Occasion Of That Salman Shared A Photo And Wrote A Post, Said 'thank You All'

सलमानची 31 वर्षे : 1988 मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' ने केला होता डेब्यू, पोस्ट शेअर करून सर्वांचे मानले आभार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानने इंडस्ट्रीमध्ये 31 वर्ष पूर्ण केले आहेत. 27 ऑगस्टला त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक बालपणीचा फोटो शेअर करत सर्वांचे आभार मानले. "31 वर्षांच्या प्रवासात, त्यानेही माझी साथ दिली. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. इंडियन फिल्म इंडस्ट्री आणि माझे सर्व फॅन्स यांचे विशेष आभार ज्यांच्यामुळे हा प्रवास यशस्वी होऊ शकला."
 

 

चटईवर खेळतो आहे छोटा सलमान... 
सलमानने आपल्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चटईवर मस्ती करताना दिसत आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोसोबत सलमान खानने एक गोड नोटदेखील शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे, 'इंडियन फिल्म इंडस्ट्रीचे आणि त्या सर्वांचे आभार जे माझ्या 31 वर्षांच्या या प्रवासात माझ्यासोबत सामील झाले. यामध्ये माझे प्रशंसक आणि शुभचिंतक विशेषतः सामील आहेत, ज्यांनी हा प्रवास खूप छान बनवला.'
 

असा होता सलमानचा प्रवास... 
दिग्गज पटकथा लेखक सलीम खान आणि सलमा यांचा मुलगा सलमानने 'मैंने प्यार किया', 'सनम बेवफा', 'साजन', 'अंदाज अपना अपना', 'हम आपके हैं कौन', 'करण-अर्जुन', 'हम दिल दे चुके सनम', 'हम तुम्हारे हैं सनम', 'तेरे नाम', 'हम साथ-साथ हैं' यांसारखे हिट चित्रपट दिले. कॉमेडी जॉनरचा चित्रपट 'बीवी नं. 1', 'मुझसे शादी करोगी', 'रेडी' आणि 'नो एंट्री' नंतर 2000 पासून त्याने अॅक्शन चित्रपट करायला सुरुवात केली. ज्यामध्ये 'दबंग', 'वॉन्टेड', 'एक था टायगर', 'किक', 'टायगर जिंदा है' हे चित्रपट सामील आहेत. 
 

बीइंग ह्यूमनमधून चॅरीटीदेखील करतो...  
53 वर्षांच्या सलमानने 'सुल्तान' सारख्या खेळावर आधारित चित्रपटातही काम केले. आणि 'बजरंगी भाईजान' यांसारखे अनेक भावनिक चित्रपटही केले. आपल्या अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त सलमान एक चित्रपट निर्माता, एक टेलिव्हिजन होस्ट आहे आणि आपली चॅरिटी संस्था 'बीइंग ह्यूमन फाउंडेशन' च्या माध्यमातून गरजूंची मदतही करतो. 

बातम्या आणखी आहेत...