Home | Gossip | Salman's actress Aarti Chhabriaa get married, wedding photo got viral

अभिनेत्री आरती छाबडियाने गुपचुप केले लग्न, सलमानच्या अभिनेत्रीचे लग्नाचे फोटो झाले व्हायरल 

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 26, 2019, 11:05 AM IST

36 वर्षांच्या वयात अभिनेत्रीने केले लग्न 

 • Salman's actress Aarti Chhabriaa get married, wedding photo got viral

  एंटरटेन्मेंट डेस्क : या वेडिंग सीजनमध्ये आणखी एका अभिनेत्रीने लग्न केले आहे. ही अभिनेत्री आहे आरती छाबडिया. आरतीने विशारदसोबत लग्न केले आहे. आरती आणि विशारद यांच्या लग्नाचे फोटोज समोर आले आहेत. विशारद ऑस्ट्रेलियामध्ये टॅक्स कंसल्टंटचा जॉब करतो. लाल ड्रेसमध्ये आरती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटोज इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहेत.

  आरतीने याचवर्षी मार्चमध्ये विशारदसोबत गुपचुप साखरपुडा केला आहे. आरतीने Spotboye सोबत बातचीत करताना साखरपुड्याची बातमी कन्फर्म केली होती. आरती म्हणाली होती, 'मी आणि विशारदने 11 मार्चआपल्या घरच्यांच्या उपस्थित मॉरिशसमध्ये साखरपुडा केला होता. मला एखादा खरा माणूस मिळेल याची मी अपेक्षाच सोडली होती.'

  आरती छाबडिया म्हणाली, 'माझ्या कुटुंबियांना वाटायचे की, मला सर्वात चांगली व्यक्ती मिळेल. मी जेव्हा विशारदला भेटले तेव्हा मला जाणवले की, त्याच्यामध्ये ते सर्व आहे की, ज्याचे मी स्वप्न पाहात होते. मी नशीबवान आहे की, एवढ्या उशिरा पण माझे अरेंज मॅरेज होत आहे.'

Trending