आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबाजसोबत हाणामारी करताना सलमानच्या डोळ्यात आले होते पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खानचा आगामी 'दबंग 3' वाळू माफियावर आधारित आहे. याबरोबरच यात भावांचे महाभारतदेखील चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. चित्रपटात अरबाज खाान सलमानच्या छोट्या भावाच्या भूमिकेत आहे. चित्रपटात दोघांचे भांडण होते त्यात ते लढाई करतात. त्याच्या शूटिंगदरम्यान सलमान खानच्या डोळ्यात पाणी आले होते. खरं तर, सलमान खऱ्या अायुष्यात आपल्या भावांवर आणि आई-वडिलांवर खूप प्रेम करतो. या दृश्यात भावासोबत झालेल्या भांडणाच्या दृश्यानेदेखील त्याला रडू आले.

का चित्रित करण्यात आले हे दृश्य
सलमानचे पात्र चुलबुलचे यश पाहून अरबाजचे पात्र मक्खी पांडेदेखील प्रेरित हाेतो. तो चुकीचे मार्ग सोडून चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतो. हे चुलबुलला आवडत नाही. त्यामुळे दोघांमध्ये भांडण होते, ते मारामारीपर्यंत जाते. तेथेच ते अॅक्शन दृश्य चित्रीत करण्यात आले आहे.

कोरिअोग्राफरला सांगून हवालदाराला घेतले
चित्रपटात हवालदार चौबेजीची भूमिका करणारा कलाकार राम सुजान सिंहसोबत सेटवर सलमानचे चांगले पटत होते. सलमान त्याच्यासोबत व्हॅनिटी व्हॅनमध्ये जेवण करत होता आणि गप्पागोष्टीदेखील शेअर करायाचा. याविषयी राम सुजान म्हणतो..., सलमान जितका मोठा स्टार आहे, तितकाच तो मोठ्या मनाचाही आहे. ज्याला मनापासून तो अापले मानतो त्याला तो कधीच सोडत नाही. उदाहरण म्हणजे गेल्या भागात सलमानचे हवालदारासोबत एक गाणे होते जे तिसऱ्या भागात नव्हते. ही गोष्ट जेव्हा सलमानला कळाली तेव्हा त्याने कोरिअोग्राफरला सांगून तिन्ही पात्रांना डान्समध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर आम्हाला डान्सचा सराव करायला लावला त्यामुळे आम्हीदेखील 'मुन्ना बदनाम' गाण्यात येऊ शकलो.

'दबंग 2' च्या शूटिंगवेळी सलमानने मला जेव्हा जमिनीवर एकटे जेवण करताना पाहिले तेव्हा त्याने आपल्यासोबत जेवण करण्याचे संागितले. कधी स्पाॅट बॉय आणि क्रू मेंबर्सच्या पगाराला उशीरा झाला तर तो स्वत: द्यायला लावायचा. - राम सुजान सिंह, अभिनेता

बातम्या आणखी आहेत...