आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman's Hand Grabbed By A Female Fan While Coming From 'Hum Apke Hai Kaun' Screening, She Also Tried To Hug Him

'हम आपके हैं कौन' : स्क्रीनिंगनंतर महिला फॅनने पकडला सलमानचा हात, बळजबरीने आलिंगन देण्याचा केला प्रयत्न 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : शुक्रवारी रात्री मुंबईच्या लिबर्टी सिनेमा हॉलयामध्ये 90 दशकांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हम आपके हैं कौन' चे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले होते. यावेळी चित्रपटाची जवळपास पूर्ण स्टारकास्ट आली होती. सलमान खानदेखील तेथे पोहोचला होता. इव्हेन्ट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा सलमान थिएटरमधून बाहेर निघाला तेव्हा एका महिला फॅनने जबरदस्ती त्याला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान बॉडीगार्ड्स पूर्णपणे सतर्क दिसले. 
 

बॉडीगार्ड्सने महिलेला केले बाजूला.... 
झाले असे की, जेव्हा सलमान खान आणि माधुरी दीक्षित सिनेमा हॉलमधून बाहेर पडत होते तेव्हा फॅन्सने त्यांना घेरले. माधुरीच्या बॉडीगार्ड्सने तिला गर्दीतून काढले आणि तिला कारपर्यंत पोहोचले. इकडे सलमानसोबत 4-6 बॉडीगार्ड्स होते, जे त्याला कारपर्यंत सुरक्षित घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. याचदरम्यान एक महिला फॅन बॉडीगार्ड्सला बाजूला सारत सलमानजवळ पोहोचली आणि जबरदस्ती त्याचा हात पकडला. सलमान एकदम हैरान झाला होता. त्याला काही समजावे यापूर्वीच महिला त्याला आलिंगन देण्याचा प्रयत्न करू लागली. तोपर्यंत सलमानचे बॉडीगार्ड्स जवळ पोहोचले होते आणि त्यांनी त्या महिलेला बाजूला केले आणि सलमानला कारपर्यंत पोहोचवले.  
 

1994 मध्ये रिलीज झाला होता 'हम आपके...'
'हम आपके हैं कौन' 5 ऑगस्ट 1994 ला रिलीज झाला होता. लिबर्टी सिनेमा हॉलमध्ये याची 25 वी अॅनिवर्सरी साजरी केली गेली. यासाठी लिबर्टी हे ठिकाण यासाठी निवडले कारण 25 वर्षांपूर्वी चित्रपटाचा प्रीमियर साउथ मुंबईच्या याच सिनेमाहॉलमध्ये झाला होता, जिथे हा चित्रपट 125 आठवडे चालला होता. सांगितले जाते की, त्यावेळी केवळ या एका सिनेमागृहात चित्रपट पाहणाऱ्या ऑडियंसची संख्या सुमारे 20 लाख होती. 

बातम्या आणखी आहेत...