आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman's 'Radhe' Will Be Released Next Year On Eid, Shared First Look On Twitter

​​​​​​​पुढच्यावर्षी ईदला रिलीज होईल सलमानचा 'राधे', ट्विटरवर शेअर केला फर्स्ट लुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानचा यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार चित्रपट "दबंग-3" सोबतच राधेचे मोशन पोस्टरदेखील शेअर केले आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी ईदला रिलीज होईल. विशेष गोष्ट ही आहे की, एका मिनिटांच्या मोशन पोस्टरमध्ये सलमान फर्स्ट हाफमध्ये "दबंग-3" मधील पोलिस अधिकारी चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसत आहे, तर त्याच्या दुसऱ्या हाफमध्ये त्याने "राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई" ची झलक दाखवली आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, "तुम्ही वैचारले होते ना 'दबंग 3' च्या नंतर काय ? काय आणि केव्हा ? हे आहे उत्तर." संजय लीला भन्साळींचा "इंशाअल्लाह" थांबल्यानंतर दुःखी झालेल्या सलमानच्या फॅन्सना पुन्हा एकदा "राधे" च्या घोषणेने उत्साहित केले आहे.  

'वॉन्टेड' चा सीक्वल, कोरियन चित्रपटाचा आहे रीमेक... 
अयानंकाने कॅप्शनच्या सुरुवातीला दोन शब्द 'लॉक्ड अँड लोडेड' लिहिले आहे, जे बंदुकीची वापरले जातात. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, सलमान पुन्हा एकदा पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत परतत आहे. तसेच पेपरवर लिहिले, 'राधे' त्याचा चित्रपट 'वॉन्टेड' (2009) ची आठवण करून देत आहेत. रिपोर्ट्सनुसार, 'राधे : इंडियाज मोस्ट वांटेड कॉप' 'वांटेड' चा सीक्वल आहे. पहिल्या पार्टप्रमाणे हा पार्टदेखील प्रभुदेवाच डायरेक्ट करणार आहे. हा 2017 मध्ये आलेला कोरियन फिल्म 'आउटलॉज' चा अधिकृत रीमेक असणार आहे.