आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: या मुलीच्या एका पोस्टमुळे साजिद खान अडकला अडचणीत, अक्षयला थांबवावा लागला चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: #MeToo कॅम्पेनमध्ये आता फराह खानचा भाऊ साजिद खानवरही सेक्शुअल हरॅशमेंटचा आरोप लावला आहे. साजिदवर त्याची पुर्व असिस्टेंट डायरेक्टर आणि अॅक्ट्रेस सलोनी चोप्राने सेक्शुअल हरॅशमेंटचा आरोप लावला आहे. सलोनी वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. ती नेहमीच चर्चेत असते. वुमन इम्पॉवरमेंट, फेमिनिज्म आणि जेंडर इक्वॅलिटीच्या मुद्दांवर बेताल वक्तव्य असो किंवा महिला अधिका-यांसोबत बोलणे असो, सलोनी सोशल मीडियावर नेहमीच आवाज उठवत असते. साजिद खान विरुध्दही सलोनीने ट्विटरवर मोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले की, साजिदने तिला बिकिनी फोटो मागितले होते, अनेक वेळा चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला आणि वाईट कमेंट्स केल्या. साजिदवर आरोप लावल्यानंतर अक्षयने त्याला चित्रपटापासून दूर केले. 'हाउसफुल 4' ची शूटिंगही थांबली. यासोबतच साजिदचे भाऊ-बहीण आणि मित्रही त्याच्या विरुध्द आहेत.

 

एमटीव्ही सीरिज 'गर्ल्स ऑन टॉप' मध्ये प्रसिध्द झालेली अभिनेत्री सलोनी चोप्रा आपल्या हॉट अंदाजामुळे मीडियामध्ये चर्चेत असते. सलोनीचा लुक कतरिना कैफसारखा आहे. यामुळे अनेक वेळा लोक तिला कतरिनासारखी हुबेहुब दिसते असते म्हणतात. काही काळापुर्वी फोटो शेअर करत सलोनीने लिहिले होते की- महिलांच्या शरीराला फक्त उपभोगाचे साधन समजले जाते. अनेक वेळा तोडके कपडे घालणे, हे रेपचे कारण सांगितले जाते. महिलांनी आपले किती शरीर झाकावे हा नेहमीच वादाचा मुद्दा असतो. समाजात महिला आणि पुरुषांच्या शरीराविषयी वेगवेगळी वागणुक असते यामुळे सलोनी नेहमी नाराज असते. सध्या इंस्टाग्रामवर सलोनीचे 2 लाख 87 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सलोनीने सलमानच्या 'रेस 3' वरही काम केले आहे. यासोबतच ती एक शॉर्ट फिल्म 'माया' मध्येही दिसली आहे. 

 

ब्रासोबतचा फोटो केला आहे पोस्ट 
जुलै, 2016 मध्ये सलोनीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती हातात ब्रा दिसत होती. हा फोटो शेअर करत तिने लोकांची ब्रेस्ट विषयीच्या दृष्टीकोणावर प्रश्न उपस्थित केले होते. सलोनीने लिहिले होते - "जर पुरुष विना शर्टचे फिरु शकतात तर महिला ब्रामध्येही दिसू शकत नाही का" सलोनी महिलांच्या अधिकारांविषयी नेहमीच प्रश्न उपस्थित करत असते. यापुर्वी तिने महिलांविषयी 'Free The Nipple' कॅम्पेन चर्चेत होते. सलोनीने मुंबईच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट हाय स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. यानंतर तिने यूनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधून हायर एज्यूकेशन घेतले आहे. 

बातम्या आणखी आहेत...