Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | salt water beauty tips in marathi

पाणी आणि मिठाने दूर होतात दहा सौदर्य समस्या, अवश्य ट्राय करा

हेल्थ डेस्क | Update - Aug 14, 2018, 12:02 AM IST

मिठाचे पाणी सौंदर्यासंबंधीत अनेक तक्रारी दूर करते. पाणी आणि मीठ दोन्हींमध्ये असणारे काही घटक त्वचा आणि केसांसाठी फायदेशी

 • salt water beauty tips in marathi

  मिठाचे पाणी सौंदर्यासंबंधीत अनेक तक्रारी दूर करते. पाणी आणि मीठ दोन्हींमध्ये असणारे काही घटक त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. तुम्ही अंघोळीच्या पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा. पाण्यात मीठ मिसळून दोन वेळा चेहरा धुतल्याने अनेक फायदे मिळतात...


  पाणी आणि मिठाचे 10 फायदे
  1. सावळेपणा

  यामध्ये मिनरल्स, सोडियम असते. या पाण्यात कापूस बुडवून चेहऱ्यावर लावा. सावळेपणा दूर होतो.


  2. पिंपल्स
  यामुळे त्वचेचे हार्मफुल बॅक्टेरिया दूर होतात. दिवसातून दोन वेळा हे पाणी चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स लवकर ठिक होतात.


  3. केसगळती :
  यामध्ये कॉपर झिंक असते. या पाण्याने केस धुवा. केस गळतीची समस्या दूर होते.


  4. सुरकुत्या
  यामुळे त्वचेमध्ये ओलावा राहतो. यामध्ये कापूस बुडवून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा घट्ट होते. सुरकुत्यांपासून बचाव होतो.


  5. कोंडा
  यामध्ये अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. हे कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा. कोंडा दूर होतो.

  6. तेलकट त्वचा
  यामध्ये ऑइल कंट्रोलिंग प्रॉपर्टीज असतात. या पाण्याने दिवसातून दोन वेळा चेहरा धुवा. तेलकटपणा निघून जातो आणि चेहरा चमकतो.

 • salt water beauty tips in marathi

  7. व्रण 
  यामध्ये अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. हे कापसाच्या मदतीने त्वचेवर लावल्याने व्रण आणि खाज दूर होते. 


  8. काळी वर्तुळे 
  यामध्ये मिनरल्स असतात. मिठाच्या पाण्यात कापूस बुडवून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांभोवतीचे काळे डाग दूर होतात.

 • salt water beauty tips in marathi

  9. मुलायम त्वचा 
  मिठाच्या पाण्यातील मॅग्नेशियमने त्वचेचा ओलावा टिकून राहतो. हे कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. त्वचेचा मुलायमपणा वाढतो.

   
  10. पायांच्या भेगा : यामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. या पाण्यात थोडावेळ पाय बुडवून ठेवल्याने पायांच्या भेगा दूर होतात. 

Trending