Home | Maharashtra | Mumbai | Salute to 26/11 Hero Major Sandeep Unnikrishnan on his Birthday

26/11: संदीप उन्नीकृष्णन् यांनी देशासाठी बलिदानच नव्हे तर सर्वस्व अर्पण केले..वाचा शहीद मेजरची शौर्यगाथा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 06:14 PM IST

संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोपरांत दिला जाणारा शौर्य पुरस्कार अशोक चक्रने सम्मानित करण्यात आले होते.

 • Salute to 26/11 Hero Major Sandeep Unnikrishnan on his Birthday

  मुंबई- 26 नोव्हेंबर, 2008 ला संपूर्ण देशाने मुंबईत दहशतवादाचे भयावह चेहरा पाहिला होता. लष्कर ऐ तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्ला केला होता. ताज हॉटेल पॅलेसमधील नागरिकांना वेठीस धरले होते. या हल्ल्यात एटीएस, लष्कर आणि पोलिस दलातील अनेक अधिकारी शहीद झाले होते. त्या शहीद अधिकार्‍यांमध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा देखील समावेश होता. संदीप उन्नीकृष्णन यांचा आज वाढदिवस आहे. 15 मार्च, 1977 रोजी संदीप यांचा जन्म झाला होता.

  संदीप उन्नीकृष्णन हे बंगळुरुमधील एका मल्याळम् कुटुंबातील होते. संदीप यांचे आई-वडील केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील चेरुवन्नूरहून बंगळुरु येथे स्थायिक झाले होते. संदीप यांचे वडील के.उन्नीकृष्णन हे इस्रोचे सेवानिवृत्त अधिकारी आहे. आई धनलक्ष्मी उन्नीकृष्णन या गृहिणी आहेत. संदीप हे आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. संदीप यांनी बंगळुरुमधील फ्रॅंक एंथनी पब्लिक स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले होते. 1995 मध्ये साइंस स्ट्रीममधून त्यांची आयएससी पूर्ण केले.

  संदीप उन्नीकृष्णन यांनी 1995 मध्ये एनडीएमध्ये प्रवेश घेतला. चार वर्षांनंतर त्यांना एक संधी मिळाली, या संधीच्य प्रत्येक भारतीय जवान प्रतिक्षेत असतो. अर्थात 1999 मध्ये कारगिल युद्धात जाण्याची संदीप यांना संधी मिळाली होती. नंतर 2007 मध्ये संदीप यांची निवड राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) स्पेशल अॅक्शन ग्रृपमध्ये (एसएजी) झाली. संदीप हे निडर आणि बलवान होते. अत्यंत अतितटीच्या परिस्थितीतही ते मागे सरकत नव्हते.

  मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांनी वेठीस धरलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या एसएजीच्या पथकाचे नेतृत्त्व मेजर संदीप करत होते. संदीप आपल्या 10 कमांडोंजसह हॉटेल ताजमध्ये शिरले होते. दहशतवादी त्यांच्या दिशेने ग्रेनेड फेकत होते, गोळीबार करत होते. तरी देखील संदीप यांचे पथक मागे हटले नाही. त्यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यादरम्यान, दहशतवाद्यांकडून आलेली एक गोळी संदीप यांचे सहकारी सुनील यादव यांना लागली. संदीप यांनी तातडीने सुनील यादव यांना बाहेर पाठवले. तरी देखील सुनील यांना वाचविता आले नाही. दहशतवाद्यांशी चकमक सुरुच होती. काही गोळी संदीप यांना लागल्या. परंतु संदीप यांनी हिम्मत सोडली नाही. संदीप यांनी यशस्वीपणे 14 नागरिकांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली. संदीप यांच्या टीमने चोख प्रत्युत्तर दिल्याने दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. मेजर संदीप दहशतवाद्यांच्या मागे पळाले. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना न येण्याच्या सुचना दिल्या. संदीप यांनी एकट्याने दहशतवाद्याशी दोन हात केले. संदीप यांनी काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, एक दहशतवाद्याने संदीप यांच्या पाठीमागून त्यांच्या हल्ला केला. गंभीर जखमी झाल्यानंतरही संदीप दहशतवाद्यांविरुद्ध लढत होते. आपल्या अंतिम श्वासापर्यंत संदीप यांनी भारत मातेचे रक्षण केले.

  मेजर संदीप यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या बंगळुरु येथील घराबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 'संदीप उन्नीकृष्णन अमर रहे' च्या घोषणा दिल्या जात होत्या. संदीप यांचे पार्थिव आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. लष्करी इतमामात संदीप यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.

  बंगळुरुमधील एका मार्गाला दिले संदीप उन्नीकृष्‍णन यांचे नाव
  बंगळुरुमधील रामामूर्ति नगर आउटर रिंग रोड जंक्शनला संदीप उन्नीकृष्णन असे नाव देण्यात आले आहे. चौकात संदीप यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोपरांत दिला जाणारा शौर्य पुरस्कार अशोक चक्रने सम्मानित करण्यात आले होते.

  'मेजर' ‍सिनेमा येणार..

  तेलगु अॅक्टर महेश बाबू आणि सोनी पिक्चर्स शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार करत आहे. 'मेजर' असे या सिनेमाचे टायटल असेल. मेजर संदीप यांच्या भूमिकेत अॅक्टर अदिवी शेष दिसणार आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे फोटो..

 • Salute to 26/11 Hero Major Sandeep Unnikrishnan on his Birthday
 • Salute to 26/11 Hero Major Sandeep Unnikrishnan on his Birthday
 • Salute to 26/11 Hero Major Sandeep Unnikrishnan on his Birthday
 • Salute to 26/11 Hero Major Sandeep Unnikrishnan on his Birthday

Trending