आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Success Story: Samalkha News Farmers Daughter Became Judge By Achieving 9th Rank In Judicial Exams

8वी पास शेतकरी आई-वडीलांची मुलगी झाली न्यायाधीश; समाजातील वाईट प्रवृत्तींना दूर करण्याची इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानिपत- हरियाणात एका खेडेगावातील तरुणीने न्यायिक सेवा परीक्षेत नववी रँक मिळवून सर्वांसमोर एक नविन आदर्श ठेवला आहे. अंजली असे या तरुणीचे नाव असून ती पानिपत शहरातील जोशी या गावची रहीवासी आहे. सुभाष आणि कमलेश असे अंजलीच्या आई-वडीलांचे नाव असून ते शेतकरी आहे. शनिवारी निकाल लागल्यानंतर आई-वडीलांसह गावकरी आणि अखिल भारतीय नक्षलवाद विरोधी पक्षाचे उपाध्यक्ष नरेंद्र डिकाडला यांनी मोठ्या उत्साहाने तिचे स्वागत केले. त्यानंतर तीने आई-वडीलांसह दादा जाल या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 

 

मुलींवीषयी समाजातील लोकांचा विचार बदलण्याची इच्छा

अंजलीने सांगितले की, 'मला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्याची इच्छा आहे. समाजातील स्त्री-भ्रुण हत्यासारख्या विषयांवर मत व्यक्त करताना अंजलीने सांगितले की, समाजात वाईट प्रवृत्ती विचारांवर अवलंबून असतात त्यामुळे समाजातील लोकांना आपला विचार बदलण्याची गरज आहे.'

 

विद्यापीठातही मिळवले सुवर्णपदक

अंजलीने पंजाब विद्यापीठातही सुवर्णपदक पटकवले आहे. सप्टेंबर 2018 मध्ये न्यायिक व्यवस्थेच्या परिक्षेत अंजलीने ही रँक मिळवली होती. 2016 मध्ये पंजाब विद्यापीठात लेक्चररपदी कार्यरत असताना अंजलीने न्यायिक व्यवस्थेची परीक्षा दिली होती. सुवर्णपदक मिळवलेल्या अंजलीला माजी उपराष्ट्रपती यांच्याकडून गौरवण्यात आले आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...