आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लांडग्याशी एकटीच भिडली, साडीच्या पदराने गळा आवळून असा केला वध; ग्रामीण महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ(मध्यप्रदेश)- येथील कुरावण गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या धाडसाने सर्वांनाच चकित करून सोडले आहे. या महिलेचे नाव समंदबाई असून ती आपल्या गुरांना चारण्यासाठी गेली होती. यादरम्यान एका लांडग्याने गुरांवर हल्ला केला असता प्रसंगावधान राखून  त्यांनी लांडग्याचा सामना केला. जवळपास आर्धा तास सुरू असलेल्या या संघर्षात लांडग्याने समंदबाईना टोकदार नखांनी अनेक वेळेस घायाळ केले. पण तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या साडीने आवळून त्याला ठार केले. या हल्ल्यात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनुसार, समंदाबाईना अँटी रॅबीज इंजेक्शन देण्यात आले असून आता त्यांची प्रकृती ठिक आहे.


लांडग्याने केला डोळ्यावर हल्ला 
समंदबाईनी सांगितले,  "सोमवारी सायंकाळी 5 वाजता त्या आपल्या शेतात गुरांना चारण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान अचानक एका लांडग्याने गुरांवर हल्ला केला. त्यामुळे त्या खूप घाबरल्या पण स्वतःला सावरून लांडग्याचा प्रतिकार करण्यासाठी गेल्या. यादरम्यान झालेल्या झटापटीत लांडग्याने त्यांच्या डोळ्यावर हल्ला केला. त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या साडीने लांडग्याचा गळा आवळून त्याला जमिनीवर आपटले. जवळपास तासाभराने लांडग्याचा जीव गेला. या हल्ल्यात समंदबाईना गंभीर दुखापत झाली होती. काही वेळाने त्यांनी आपला मोबाइल शोधला आणि आपल्या पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे पती कन्हैयालाल  गावातील काही लोकांना घटनास्थळी घेऊन आले आणि तत्काळ त्यांना रूग्णालयात दाखल केले.  

 

परिसरात आहेत 40 लांडगे
ग्रामस्थांनी सांगितले की, या परिसरात 40 पेक्षा अधिक लांडगे आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी अनेक वेळेस वनविभागाकडे तक्रार केली पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तसेच, वनविभाग अधिकारी आर.एस. रावत यांनी सांगितले की, या क्षेत्रामध्ये लांडग्यांची संख्या अधिक आहे आणि या जातीचे प्राणी खूप चतूर असतात. पिंजरा लावूनसुद्धा त्यांना पकडणे कठिण आहे. त्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहण्याच इशारा वनविगाने दिला आहे.

0