आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडे गुरुजींना इस्रो प्रमुखपदी नेमा, पंतप्रधान मोदींकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी नुकतेच “अमेरिकेने त्यांचे यान एकादशीला साेडल्यामुळे यश मिळाल्याचे वक्तव्य केले हाेते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भिडे यांच्यावर टीका केली. भिडे यांची भारतीय अवकाश संशाेधन संस्थेच्या (इस्रो) प्रमुखपदी नेमणूक करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे सरचिटणीस परीक्षित तळोकर यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र पाठवून केली आहे.  तळाेकर म्हणाले, सांगलीतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ संभाजी भिडे गुरुजी यांची इस्रोच्या प्रमुखपदी तत्काळ नेमणूक करावी. भिडे गुरुजी यांनी अमेरिकेने त्यांचे यान एकादशीला साेडल्यामुळे त्यांना यश अाल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भिडे यांची नियुक्ती करण्यात यावी. श्रीहरिकाेटामधील सगळी सूत्रे त्यांच्या हाती गेल्यास ते पंचांग बघून पुढचा कार्यक्रम ठरवतील व थाेड्याच दिवसांत भारताची इस्रो ही संस्था अमेरिकेच्या नासा या संस्थेपेक्षा अव्वल ठरेल, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.