आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संभाजी भिडेला जालन्यामध्ये बंदी घाला, अन्यथा आंदोलन करु; सुधाकर निकाळजेंचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांची सभा जालना शहरातील संभाजी नगर भागात ६ जानेवारी रोजी घेतली जात आहे. या सभेस विरोध असून, वादग्रस्त विधाने करून दोन समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवणाऱ्यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी देऊ नये, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संभाजी भिडे जालन्यात आल्यास ऐनवेळी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे सुधाकर निकाळजे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

 

पत्रकार परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार सुधाकर निकाळजे, संभाजी ब्रिगेडचे चंदू पाटील, पँथर सेनेचे नेते सतीश पट्टेकर, दीपक केदार, सुरेश खरात, अन्याय प्रतिकार दलाचे दादाराव लहाने, शालिनी शर्मा, संगीता गायके, नंदा पानवाले, अर्चना सातपुते, महेंद्र शीलवंत आदींची उपस्थिती होती. संभाजी भिडे जिथे-जिथे जात आहे. तिथे-तिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या सभेवर बंदी घालण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, पँथर सेना, संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. सभा रद्द करा अन्यथा अचानकपणे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना घेराव घालून देण्यात आला.