आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या राज्यात 16 जागा लढवणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर  - संभाजी ब्रिगेड लोकसभेला १६ मतदारसंघांत स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यापैकी माढा लोकसभा मतदारसंघातून विश्वंभर काशीद आणि सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत मस्के हे संभाजी ब्रिगेडचे उमेदवार रिंगणात उतरतील, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.   

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या काळात फक्त फसवणूक करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे आम्ही निवडणूक रिंगणात उतरत आहोत. काँग्रेसबरोबर आमची बोलणी सुरू होती. मात्र, काँग्रेस आम्हाला झुलवत ठेवत असल्याने आम्ही स्वबळावर सोलापूर, माढा, पुणे, बुलडाणा, औरंगाबाद, नांदेड नगरसह १८ जागा लढण्याची तयारी केल्याचे घाडगे म्हणाले.   मूळचे सांगोला तालुक्यातील असलेले विश्वंभर काशीद हे निवृत्त उपअभियंता आहेत. सोलापूरचे उमेदवार श्रीमंत मस्के हे पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती होते. दरम्यान, औरंगाबादसाठी लवकरच उमेदवार जाहीर करू, असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...