आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, पुणे येथून लढवणार निवडणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे - संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रमुख प्रविण गायकवाड यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे गायकवाड यांनी याआधीच‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले होते. काँग्रेसने याअगोदरच पुणे लोकसभा मतदारसंघासाठी गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला होता. 

 
शनिवारी मुंबईत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत काँग्रेस लढवत असलेल्या एकेका मतदारसंघाच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रविण गायकवाड यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी वेणुगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.