आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चला हवा येऊ द्या' मालिकेत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर, संभाजीराजेंकडून माफीची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासदार संभाजीराजे म्हणाले, 'निलेश साबळेंच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा'

मुंबई- महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेली विनोदी मालिका 'चला हवा येऊ द्या' सध्या लोकप्रियतेच्या उच्च स्तरावर आहे. या मालिकेतील एका भागामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या फोटोसारखाच हुबेहूब फोटो अभिनेते कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांचा दाखवला गेला आहे. शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीचा वापर केल्याचा आरोप राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला आहे. याबद्दल मालिकेचा सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. 

याबाबत काही ट्विट करत संभाजीराजे यांनी लिहिले, "लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे."

यापुढील ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, "निलेश साबळे तसेच झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी आणि दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल."

बातम्या आणखी आहेत...