आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 व्या वर्षी पुन्हा प्रेग्नन्ट आहे 'रेस' चित्रपटाची अभिनेत्री, पहिल्यांदा फ्लॉन्ट केले 4 महिन्यांचे बेबी बंप, मोटरसायकल बिजनेसमॅनसोबत केले होते लग्न, आता अॅक्टिंग सोडून चालवते NGO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट आहे. मुंबईमध्ये सुरु असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये पहिल्यांदा 4 महिन्यांची प्रेग्नन्ट असलेल्या समीराने पब्लिक अपीयरेंस दिला. दरम्यान कार्पेटवर समीरा रेड्डी खूप कॉन्फीडेंसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. समीरा रेड्डी खूप काळापासून अभिनय जगतापासून दूर आहे. अडीच वर्षांच्या डेटींगनंतर समीराने 2014 मध्ये मराठमोळा बिझनेसमन अक्षय वर्देसोबत लग्नगाठ बांधली. अक्षय बाइकचा व्यवसाय करतो. 'वर्देंची मोटरसायकल' म्हणून अक्षयच्या बाइक्सला ओळखले जाते. समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी घोडीवर नव्हे तर बाइकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. या लग्नात समीरा आणि अक्षयच्या नातेवाईकांसोबत जवळचे मित्र सहभागी झाले होते. समीराच्या लग्नाचे प्लानिंग तिची बहीण सुषमाने केले होते. समीराने 25 मे २०१५ ला एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे आणि आता ती दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट आहे. समीराचे नाव बरेच दिवस क्रिकेटर इशांत शर्मासोबतही जोडले गेले होते. 

 

एनजीओ चालवते समीरा... 
- समीरा रेड्डी चित्रपटांपासून दूर झाल्यांनतर आता समाज सेवेच्या क्षेत्रात सक्रीय झाली आहे. ती क्रयोंस आणि ड्रीम्स होम्स एनजीओसोबत मिळून काम करते. ही संस्था बेघर मुलांना घर आणि सुरक्षा देण्याचे काम करते. आता ती खऱ्या आयुष्यात आपल्या या चांगल्या कामांमुळे अनेक बेघर मुलांची स्टार बनली आहे. 

 

समीराला मुलगी मानतो विजय माल्या...  
- समीरा रेड्डीचे विजय माल्यासोबत एक खास नाते आहे. बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन विदेशात पळून गेलेला विजय माल्या तसा तर आपल्या रंगीत रईसी शौकमुळे ओळखला जातो. समीराचेही त्याच्याशी खास कनेक्शन आहे. रिपोर्ट्सनुसार, विजय माल्या समीराला आपली मुलगी मानायचा. समीराही त्याला अंकल म्हणायची. समीराच्या लग्नात कन्यादानही विजय माल्यानेच केले होते. 

 

2002 मध्ये समीराने केला होता बॉलिवूड डेब्यू... 
- समीराचा जन्म 14 डिसेंबर, 1980 ला राजमुंदरी, आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. तिने आपल्या करियरची सुरुवात 1997 एका म्यूजिक एल्बम 'और आहिस्ता' ने केली होती.  
- समीराने आपल्या बॉलिवूड करियरची सुरुवात 2002 मध्ये फिल्म 'मैंने दिल तुझको दिया' ने केली होती.  पुन्हा  'मुसाफिर', 'डरना मना है', 'प्लान', 'टॅक्सी नंबर 9211', 'नक्शा' यांसह अनेक चित्रपटात काम केले. मात्र, तिचे करियर काही खास बनले नाही. बॉलिवूड व्यतिरिक्त तिने साउथच्याही अनेक चित्रपटात काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...