Home | TV Guide | Sameera reddy replied to the Trollers, saying, 'Her soul was too deep to explore by those who always swam in the shallow end'

समीराने ट्रोलर्सला दिले उत्तर, म्हणाली - 'जे उथळ पाण्याच्या काठावर पोहतात त्यांना माणसाच्या आत्म्याच्या खोल तळाचा अंदाज नसतो'

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 11, 2019, 12:33 PM IST

पहिल्या डिलीवरीनंतर पाच महिने बेडवर होती... 

 • Sameera reddy replied to the Trollers, saying, 'Her soul was too deep to explore by those who always swam in the shallow end'

  बॉलिवूड डेस्क : समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. यादरम्यान ती कायम सोशल मीडियावर अॅक्टिव आहे आणि आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अशातच तिने एका बीच व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये समीराचे बेबी बंप स्पष्ट दिसत होते आणि ती बिकिनीमध्ये होती ज्यामुळे लोक तिला ट्रोल करत आहेत.

  ट्रोलिंगवर समीराने दिले सडेतोड उत्तर...
  समीराने लिहिले, 'जे उथळ पाण्याच्या काठावर पोहतात त्यांना माणसाच्या आत्म्याच्या खोल तळाचा अंदाज नसतो.' समीरा यापूर्वीही बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे. तेव्हाही तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते. सर्वांचा जन्म आईमुळेच होतो, हो ना ? तर काय हे लाजिरवाणे आहे, ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि सुंदर जाणीव आहे. करिना कपूरसारख्या अनेक सेक्सी मॉमदेखील आहेत आणि काही माझ्यासारख्याही आहेत ज्यांना आई झाल्यानंतर परत शेपमध्ये यायला वेळ लागतो.

  पहिल्या डिलीवरीनंतर पाच महिने बेडवर होती...
  समीराने एका इंटरव्यूमध्ये आपल्या पहिल्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती, "प्रेग्नन्सीनंतर मला प्लॅसेंटा प्रेविया झाला होता, ज्यामुळे मी सुमारे 4 ते 5 महिने बेड रेस्टवर होते. माझे वजन वाढले होते आणि मी मानसिक रूपाने परेशान राहू लागले होते. पण हळू हळू मी यातून बाहेर पडू लागले आणि सर्वकाही ठीक झाले.

  2014 मध्ये केले होते लग्न...
  शेवटची चित्रपट तेज (2012)मध्ये दिसली होती समीरा. तिने 2014 मध्ये बिजनेसमन अक्षय वर्देसोबत लग्न केले आणि 2015 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. समीरा आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.

 • Sameera reddy replied to the Trollers, saying, 'Her soul was too deep to explore by those who always swam in the shallow end'
 • Sameera reddy replied to the Trollers, saying, 'Her soul was too deep to explore by those who always swam in the shallow end'

Trending