आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी’महामार्गाचे काम दिवाळीनंतर होणार सुरू: डिसेंबरपूर्वीच उद्घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-   मुख्यमंत्र्यांचा स्वप्नातील प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम दिवाळीनंतर सुरू केले जाणार आहे. आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी ९० टक्के जमीन महामंडळाच्या ताब्यात असून, आता ती कंत्राटदारांकडे हस्तांतरित करण्यास सुरुवात झाली आहे. 
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता महत्त्वाचे प्रकल्प डिसेंबरपूर्वीच उदघाटन करण्याचे धोरण शासनाने ठेवले आहे. त्यामुळेच अनेक अडथळे पार केलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामास आता दिवाळीनंतरचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला आहे.

 

महामार्गाकडे ९० टक्के जमिनी असून, शासकीय आणि आदिवासी जमिनींचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अवॉर्ड जाहीर करण्याची किचकट प्रक्रिया सध्या सुरू असल्याने दिवाळीपूर्वीच ती पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीनेच देण्यात आले. शिर्डीत त्याबाबत नुकतीच बैठक घेऊन सचिवांनीही त्यावर भाष्य करत यंत्रणेला कामाचा वेग वाढविण्याचे आदेशही दिले. त्यामुळे यंदाचा रब्बीचा हंगाम करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना आताच रब्बीची पेरणी आणि लागवड न करण्याची सूचना देण्याचेही आदेशही त्यांनी दिले. परिणामी समृद्धीसाठी शेतजमिनी देत मोबदलाही पदरात पाडून घेतलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा रब्बी घेण्याची अपेक्षा वाटत होती. परंतु, शासनाच्या नव्या आदेशाने त्यावर आता पाणी फेरले गेले आहे. दुसरीकडे १० टक्के शेतकऱ्यांना सक्तीने भूसंपादनाच्या नोटिसाही बजावल्या आहेत.

 

त्यांची प्रक्रिया पूर्ण होताच उर्वरित जमीन ताब्यात येणार आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या पथकाने गत आठवड्यापासूनच रस्त्यांची पाहणी करण्यास आणि जमिनींची स्थिती तपासली आहे. त्यानुसार शासकीय यंत्रणेला शेतकरी शेती करत असल्याचे कळवित त्यांनी रब्बीत पेरणी आणि लागवड न करण्यासाठी सूचना देण्याचेही सुचवल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...