रिपोर्ट/ 150 मेगापिक्सल सेंसरवर काम करत आहे सॅमसंग, ओप्पो-व्हिव्हो-श्याओमीपण या कॅमेरा लेंसला सॅमसंगकडून घेणार विकत

  • कंपनीने याची ऑफिशियल अनाउंसमेंट केली नाही

दिव्य मराठी वेब टीम

Mar 17,2020 03:57:00 PM IST

गॅजेट डेस्क- साऊथ कोरियाची कंपनी सॅमसंग 150 मेगारपिक्सल रेझोल्यूशनचा फोटो काढणाऱ्या सेंसरवर काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्या टिपस्टरच्या स्लीपी कुमाने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. दावा केला जात आहे की, सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर नॅनो सेल टेक्नोलॅाजीवर बेस्ड असेल, ज्यामध्ये कंपनीने आपल्या ISOCELL ब्राइट एचएम-1 सेंसर टेक्नोलॉजीमध्ये पण याचा वापर केला होता. याचा वापर सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस-20 अल्ट्रा स्मार्टफोमध्ये पण केला आहे. हे तंत्रज्ञान 9 पिक्सला मिळून एका पिक्सलमध्ये कनव्हर्ट करतो.


सध्या कंपनीने याची ऑफिशियल अनाउंसमेंट केली नाही, पण साउथ कोरियायी फोरम क्लेनने पब्लिश केलेल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, कंपनी 150 मेगापिक्सलवर काम करत आहे. याच रिपोर्टला टिप्सर यांनी ट्विटरवर शेअर करुन दावा केला आहे की, नव्या सेंसारची साईज 1 इंच असेल. हे सॅमसंग गॅलक्सी एस-20 अल्ट्रामध्ये आलेल्या ISOCELL ब्राइट एचएम1 सेंसरपेक्षापण मोठा असेल.


रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, मोठे सेंसर आणि अॅडवांस्ड टेक्नोलॉजीची कमी असल्यामुळे याला फक्त फ्लॅगशिप प्रो मॉडल्समध्ये दिले जाणार आहे. श्याओमी, ओप्पो आणि व्हिव्होने याची मागणी केली आहे. श्याओमी याच वर्षाच्या चौथ्या महिन्यात आपला स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. तसेच ओप्पो आणि व्हिव्हो याच सेंसरला 2021 च्या पहिल्या तीन महिन्यापर्यंत आपल्या टॉप-एंड स्मार्टफोनमध्ये वापरण्याची प्लॅनिंग करत आहे. जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 875 प्रोसेसरपेक्षा कमी आहे.

X