Home | Business | Gadget | Samsung A70 will be launched soon

सॅमसंगचा ‘ए-७०’ स्मार्टफोन लवकरच बाजारात

वृत्तसंस्था | Update - Apr 16, 2019, 11:25 AM IST

अलीकडेच सॅमसंगला भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन कंपन्यांकडून आव्हान मिळत आहे

  • Samsung A70 will be launched soon

    नवी दिल्ली- दक्षिण कोरियातील आघाडीची सॅमसंग कंपनी पुढील वर्षात ‘ए ७०’ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. मे महिन्यात ‘ए ८०’ स्मार्टफोन बाजारात येणार आहे. ‘ए ७०’ ची किंमत २५ ते ३० हजार रुपये आणि ‘ए ८०’ची किंमत ४५ ते ५० हजार रुपयांच्या दरम्यान असेल, अशी माहिती सॅमसंग इंडियाचे सीएमओ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष रणजित सिंह यांनी दिली. अलीकडेच सॅमसंगला भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन कंपन्यांकडून आव्हान मिळत आहे.


    बजेट आणि मिड सेगमेंटमधील स्मार्टफोनमध्ये हे आव्हान जास्त आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सॅमसंग ‘ए’ मालिकेतील स्मार्टफोनवर जास्त लक्ष देत आहे. ‘ए’ मालिकेतील फोन १० ते ५० हजार रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहेत. रणजित सिंह म्हणाले की, ए मालिकेतील फोन सादर करून भारतीय बाजारपेठेत आम्ही ४०० कोटी डाॅलरच्या (सुमारे २७ हजार कोटी रुपये.) महसुलाचे लक्ष्य ठेवले आहे. एक मार्चपासून ४० दिवसांमध्ये ‘ए ५०’, ‘ए ३०’ आणि ‘ए १०’ माॅडेलच्या माध्यमातून ५० कोटी डाॅलरचा (सुमारे ३.७ हजार कोटी रुपये) महसूल प्राप्तदेखील केला आहे. त्यामुळे ‘ए’ मालिकेची पूर्ण मोबाइलची श्रेणी बाजारात आल्यानंतर वार्षिक लक्ष्यदेखील पूर्ण करू शकू.

Trending