आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगने विकसित केले नवीन 'डीपफेक' तंत्रज्ञान; एका सिंगल फोटोला एक्सप्रेशनच्या व्हिडिओत बदलते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - जगातील मोठी स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान एका फोटोला व्हिडिओ क्लिपमध्ये बदलते. डीपफेक (deepfake)असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)वर काम करते. एखाद्या फोटोच्या फोटोवरून सुद्धा व्हिडिओ तयार केला जाऊ शकतो. 

 

मोनालिसा पेंटिंगचा केला व्हिडिओ
जगातील प्रसिद्ध पेंटिंग मोनालिसा या पेंटिंगवर डीपफेकचा वापर करण्यात आला. पेंटिंगचा फोटो काढण्यात आला त्यानंतर तो तीन वेगवेगळ्या प्रकारचे बोलणारे हावभाव देणाऱ्या महिलेचा व्हिडिओ तयार झाला. हा व्हिडिओ पूर्णपणे खरा वाटतो. एखाद्या फोटोच्या मदतीने हा व्हिडिओ तयार केलाय असे वाटत नाही. याला जिफ (Gif)फाइलप्रमाणे देखील पाहता येते. 

 

चेहऱ्याच्या हावभावावरून जोडला जातो फोटो

फोटोला व्हिडिओत बदलण्यासाठी इमेजनरी सोर्स आणि ट्रेनिंग डेटाची आवश्यकता असते. या दोघांनीच ही किमया घडते. हे फोटोला चेहऱ्याच्या हावभावांना आर्टिफिशियल टेक्नोलॉजीच्या मदतीने फिक्स करते. यानंतर क्लिप तयार होते. 

 

फोटो ते व्हिडिओ क्लिप बनण्याची प्रक्रिया
सर्वात पहिले डीपफेक तंत्रज्ञान तुमच्या चेहऱ्यांच्या हालचाली समजून घेते. यानंतर ते त्याला फेस लँडमार्कमध्ये बदलते. लँडमार्कमध्ये वेगवेगळ्या ट्रेनिंग फ्रेममध्ये बदलण्यात येते. आता ज्या फोटोला व्हिडिओ क्लिपमध्ये बदलायचे आहे त्याला ट्रेनिंग फ्रेममध्ये फिक्स करते. किंवा फेस लँडमार्कनुसार त्या फोटोला हावभाव देते. ट्रेनिंग फ्रेम जितकी चांगली असेल व्हिडिओ क्लिप तितक्या चांगल्या प्रतीची येईल. ही प्रतिमा 1, 8 किंवा 32 शॉटसोबत कन्व्हर्ट करता येते.