आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासियोल - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे सेमीकंडक्टर बनवणाऱ्या फॅक्ट्रीमधील कामगारांना कॅन्सरसह इतर गंभीर आजार होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. वाढत्या प्रकरणांवरून आता कंपनीला माफी मागावी लागली आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांवर तोडगा काढून कंपनीने 320 व्यक्तींना प्रत्येकी 13.3 लाख अमेरिकन डॉलर (95 लाख रुपये) देण्याची तयारी दाखवली आहे. यातील 118 कर्मचारी आज जगात नाहीत.
सॅमसंगने मान्य केली चूक
> सॅमसंगचे सह-अध्यक्ष किम की-नेम यांनी सांगितले, "आम्ही आमच्या कामगारांनाबद्दल खेद व्यक्त करतो, ज्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांना आजारा झाला आहे. आम्ही आमच्या सेमीकंडक्टर आणि एलसीडी कारखान्यांमध्ये हेल्थ रिस्कचे व्यवस्थापन करण्यात अयशस्वी ठरलो.'
118 लोकांचा मृत्यू
> या प्रकरणात कंपनीविरुद्ध मोहीम चालविणाऱ्या ग्रुपने म्हटले आहे की सॅमसंगमध्ये नोकरी मिळाल्यानंतर 320 लोकांना विविध रोगांनी ग्रासले होते. त्यातील 118 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या महिन्यात घोषित केलेल्या एका करारानुसार कंपनी 1.33 लाख डॉलर्सची भरपाई देणार आहे.
पुढच्या स्लाइडवर वाचा कोण-कोणते आजार झाले...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.