टेक / ट्रिपल रिअर कॅमेरा आणि पंच-होल डिस्ले असलेला सॅमसंग गॅलेक्सी A-11 स्मार्टफोन लाँच, 4000mAh बॅटरीसह मिळेल 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट

जाणून घ्या सॅमसंग गॅलेक्सी ए11 चे बेसिक स्पेसिफिकेशन

दिव्य मराठी वेब टीम

Mar 17,2020 02:03:00 PM IST

गॅजेट डेस्क- सॅमसंगने गॅलेक्सी ए-सीरीजमधील नवीन फोन गॅलेक्सी ए-11 लाँच केला आहे. कंपनीने ऑफिशिअल वेबसाइटवर या फोनचे डेडिकेटेड पेज तयार केले आहे. त्यात या फोनच्या स्पेसिफिकेशन्ससह संपूर्ण माहिती दिलेली आहे. वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये पंच-होल डिझाइन मिळेल. तसेच, बॅक पॅनलवर व्हर्टिकल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. कंपनीने किंमत आणि उपलब्धता याविषयी माहिती दिलेली नाही. कंपनीने यावर्षीच गॅलेक्सी ए-सीरीजमध्ये दोन फोन गॅलेक्सी ए-51 आणि गॅलेक्सी ए-71 लॉन्च केले आहेत, यातच आता नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन गॅलेक्सी ए-11 जोडला आहे.


तुर्तास कंपनीने या फोनची किंमत आणि उपलब्धता या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच, फोन ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा कोणत्या मार्केटमध्ये लाँच होईल, याची माहिती अद्याप दिलेली नाही. प्रत्येक बाजारपेठत याची वेगवेगळी किंमत पाहायला मिऴू शकते. पेजवर दिलेल्या माहितीनुसार, फोन चार कलर ऑप्शन ब्लॅक, ब्लू, रेड आणि व्हाइटमध्ये उपलब्ध होईल. तर, त्याच फोटोमध्ये व्हर्टिकल ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल, जो लेफ्ट कॉर्नरला प्लेस्ड आहे. कोपऱ्यात व्हॉल्यूम, सिम-ट्रे आणि पॉवर बटन दिलेले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए11 चे बेसिक स्पेसिफिकेशन

यामध्ये 6.64 इंचचा एचडी प्लस इंफिनिटी-ओ टीएफटी डिस्प्ले मिळेल, जो 720x1560 पिक्सल रेझोल्यूशनला सपोर्ट करतो. 177 ग्रॅम वजनी असलेल्या फोनचे डायमेंशन 161.4 x76.3x8.0 एमएम आहे. फोनमध्ये 1.8 गीगाहर्ट्सचा ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल, ज्यात 2 जीबी आणि 3 जीबी रॅम असेल. फोनमध्ये 32 जीबीचे ऑनबोर्ड स्टोरेज मिळेल. तसेच मायक्रो एसडी कार्डने याच्या स्टोरेजला 512 जीबी पर्यंत वाढू शकता येईल.


फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल. यामध्ये 13 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर मिळेल. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा सेंसर मिळेल. फोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी मिळेल, जी 15 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये रिअर फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सपोर्ट आहे.

X