आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Samsung Galaxy A20s With Triple Rear Cameras, Snapdragon 450 SoC Launched In India: Price, Specifications

ट्रिपल रिअर कॅमरा आणि 15 वॉट चार्जरसोबत गॅलेक्सी A20s लॉन्च, किंमत 11999 रुपयांपासून सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- सॅमसंगने आपल्या A सीरीजचा नवा स्मार्टफोन गॅलेक्सी A20s लॉन्च केला आहे. हा A20 स्मार्टफोनचे अपग्रेड व्हर्जन आहे. नवीन A20s स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमरा मिळेल. सोबतच डॉल्बी एटम्स सराउंड साउंड टेक्नोलॉजी आणि 15 वॉटचा फास्ट चार्जर मिळेल.सॅमसंग गैलेक्सी A20s ची किंमत


> 3GBरॅम + 32GB स्टोरेज : 11,999 रुपये
> 4GB रॅम + 64GB स्टोरेज : 13,999 रुपये
या फोनला ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. याला सॅमसंग इंडिया ई-शॉप, सॅमसंग ओपेरा हाउस आणि लीडिंग ई-कॉमर्स पोर्टल्सवरुन खरेदी केले जाऊ शकते.सॅमसंग गॅलेक्सी A20s स्पेसिफिकेशन
 
फोनमध्ये डुअल नॅनो सिम स्लॉट आहे. हा अँड्रॉयड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. फोनमध्ये 6.5-इंच HD+ डिस्प्ले स्क्रीन दिली आहे. याचे रेजोल्यूशन 720x1560 पिक्सल आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 ऑक्टाकोर प्रोसेसरसोबत 4GB पर्यंत रॅम दिली आहे.

 


स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप दिला आहे. जे 13 मेगापिक्सल (f/1.8) प्रायमरी लेंस, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसरसोबत मिळेल. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा आहे.
फोनचे ऑनबोर्ड स्टोरेज 64GB पर्यंत आहे. तर मायक्रो SD कार्डने 512GB पर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ v4.2, GPS/ A-GPS USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक कनेक्टिविटी ऑप्शन आहे. यात 4,000mAh ची बॅटरी 15W वॉटचे फास्ट चार्जरसोबत येते.

बातम्या आणखी आहेत...