आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 कॅमेरे असणारा जगातील पहिला स्मार्टफोन, सर्व कॅमेऱ्यांची पॉवर 71 मेगापिक्सेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - सॅमसंगने गतमहिन्यात आपला Galaxy A9 (2018) स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे हा जगातील पहिलाच 4 रिअर कॅमेरे असणारा स्मार्टफोन आहे. यात एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत. आता कंपनीने हा भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी याला दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे.

 

न्यूज एजन्सी IANS च्या रिपोर्टनुसार, सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 6GB RAM + 128GB मेमरी आणि 8GB RAM + 128GB मेमरी मिळेल. दोन्ही स्मार्टफोन्सना मायक्रो SD कार्डच्या मदतीने 512GB पर्यँत वाढवले जाऊ शकते. असे मानले जात आहे की, भारतात या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 39,000 रुपये असेल.

 

या स्मार्टफोनला गतमहिन्यात मलेशियात लॉन्च करण्यात आले होते. याची सुरुवातीची किंमत EUR 599 (तब्बल 51,300 रुपये) ठरवण्यात आली आहे. हा फोन बबलगम पिंक, कॅव्हियर ब्लॅक आणि लेमोंडे ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 

 

4 रिअर कॅमेरे असणारा स्मार्टफोन
स्मार्टफोनमध्ये 24MP, 10MP, 8MP आणि 5MP चे कॅमेरे देण्यात आले आहेत. 24 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा f/1.7 अपरचरसोबत येतो. दुसरीकडे, 10 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमरा 2x ऑप्टिकल झूमसोबत येतो. याचे f/2.4 अपरचर आहे. तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड आहे. हा 120 डिग्री एरिया कव्हर करतो. दुसरीकडे शेवटचा कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे जो डेप्थवर फोकस करतो. विशेष बाब अशी की, तुम्ही झूम न  करता एखादा ऑब्जेक्ट जवळ आणू शकता. दुसरीकडे, फ्रंट कॅमरा 24MP आहे. अशा प्रकारे या फोनमध्ये एकूण 71MP कॅमेरा पॉवर मिळेल.

 

स्पेसिफिकेशन

डिस्प्ले 6.3 इंच
प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 660
रॅम 6/8 जीबी
स्टोअरेज 64/128 जीबी
फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सेल
रिअर कॅमेरा 24+8+10+5 मेगापिक्सेल
बॅटरी 3,730 mAh
 

 

 

बातम्या आणखी आहेत...