Samsung Galaxy M20 review: चांगला डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा आणि पॉवरफूल बॅटरी बॅकअपचे कॉम्बिनेशन...


शाओमी, रिअलमी आणि हॉनरच्या बजेट स्मार्टफोनसोबत असेल टक्कर.

दिव्य मराठी वेब टीम

Apr 04,2019 06:46:00 PM IST

नवी दिल्ली- Samsung ने काही दिवसांपूर्वी ब्रँड न्यू M सीरीजचे दोन स्मार्टफोन Galaxy M20 आणि Galaxy M10 लाँच केले आहेत. कंपनी या स्मार्टफोनने अशा लोकांना टार्गेट करत आहे, जे मागील काही वर्षांत शाओमी, रिअलमी आणि ओप्पो सारख्या कंपनीच्या बजेट स्मार्टफोनचे कस्टमर बनले होते. सॅमसंगने नो या दोन्ही फोनच्या किमती कमी ठेवत J सीरीजपेक्षा चांगला फोन मार्केटमध्ये आणला आहे. Samsung Galaxy M20 ची किंमत 10990 रूपये आहे, तर M10 ची किंमत 7990 रूपये आहे.


Galaxy M20 डिस्प्ले
Samsung चा हा स्मार्टफो डिस्प्लेच्या बाबतीत या प्राइस रेंजमध्ये टॉपवर आहे. यात 6.3 इंच फूल एचडी प्लस डिस्प्ले आहे, जो वाटरड्रॉप नॉचसोबत येतो. यांत कंपनीने इंफिनिटी V डिस्प्ले दिला आहे. त्याशिवाय Galaxy M20 उत्कृष्ट ब्राइटनेस लेव्हल आणि कॉन्ट्रास्ट आणि कलर ऑप्शनसोबत मिळतो. स्क्रीनचा बेजल कमी आहे, म्हणजेच स्क्रीनच्या चारही किनाऱ्यावर पातळ ब्लॅक बॉर्डर आहे.


डिझाइन
सॅमसंग गॅलेक्सी M20 प्लास्टिक बॉडीमध्ये आहे, जी खुप इंप्रेसिव्ह दिसत नाही. पण प्लास्टीक बॉडीमुळे फोनचे वजनही कमी आहे. फोनच्या मागील बाजुस ग्लासी लुक दिला आहे. फिंगरप्रींट फोनच्या बॅक साइडला बसवण्यात आला आहे, जो पाहताना चांगला नाही दिसत.


कॅमरा
डुअल रिअर कॅमरा(13MP + 5MP) - सॅमसंगने M20 मध्ये डुअल रिअर कॅमेरा दिलेला आहे. पण Ultra Wide Angle कॅमरा याला इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळे बनवतो. हा 13MP प्रायमरी सेंसर आणि f/1.9 अपर्चकसोबत येतो, जर सेकेंडरी कॅमरा 5MP आणि 120 डिग्रीच्या Ultra wide angle सेंसरसोबत येतो. यात f/2.2 चे अपर्चर मिळते. सॅमसंगच्या नॉर्मल कॅमरापेक्षा वाइड अँगल कॅमराने दिवसा चांगले फोटो घेता येतात. पण लो लाइटमध्ये यातून म्हणावे तितके चांगले फोटोज नाही येत.


सेल्फी कॅमरा (8MP)- फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यातून चांगली सेल्फी घेता येते.


हार्डवेअर परफॉर्मंस
गॅलेक्सी M20 फोनमध्ये Exynos 7904 ऑक्टाकोर प्रोसेसर दिले आहे. हा फोन जुन्या अँड्रॉइड ओरीओ 8.1 वर काम करतो. या फोनमध्ये नवीन UI 9.5 देखील दिला आहे,जे खुप चांगले दिसते. यात स्टोरेजसाठी M20 मध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आणि 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचे ऑप्शन आहे. फोन कॉल क्वालिटीमध्येही चांगला आहे. पण गेमींग जास्तवेळ केल्यास यात हीटींगची समस्या येते.

बॅटरी
सॅमसंगने बॅटरीच्या बाबतीत चांगले काम केले आहे. गॅलेक्सी M20 मध्ये 5000 mAh ची पॉवरफूल बॅटरी दिली आहे, जी एका चार्जिंगमध्ये दोन दिवस चालवली जाऊ शकते. यात टाइप C पोर्ट आणि 15 व्हॅटचे फास्ट चार्जिंग सॉकेट आहे.


सिक्योरिटी फीचर्स
गॅलेक्सी M20 मध्ये सिक्योरिटी फीचर्ससाठी पॅटर्न लॉक, फिंगर प्रिंट स्कॅनर आणि फेस रिकग्निशन मिळते. यातील फिगरप्रिंट सेंसर आणि फेस रिकग्निशन चांगलेकाम करते. काही वेळेला लो लाइटमध्ये फेस रिकग्निशन काम करत नाही.


का विकत घ्यावा
10 हजारचा प्राइस रेंजमध्ये फोन खरेतीचा प्लॅन असेल तर, Samsung Galaxy M20 एक चांगला पर्याय आहे.

X
COMMENT