18 मार्च रोजी लॉन्च होईल सॅमसंग गॅलक्सी M21, यात मिळले 6000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रिअर कॅमेरा

  • हा मोबाइल 4जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज या दोन व्हेरिएंटमध्ये मिळेल

दिव्य मराठी वेब टीम

Mar 16,2020 08:33:00 PM IST

गॅजेट डेस्क - सॅमसंग 18 मार्च रोजी भारतीय बाजारात गॅलक्सी एम21 लॉन्च करणार आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स म्हणून 48 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. रिपोर्ट्सनुसार, सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी फोनमध्ये 20 मेगाफिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या मोबाइलमध्ये 6.4 इंच एमोलेड डिस्प्लेसोबत 6000 एमएएचची बॅटरी मिळणार आहे. तसेच यामध्ये ऑक्टा-कोर अॅक्सीनॉस 9611 प्रोसेसर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा मोबाइल 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम/ 128 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल.


कंपनीने मागील वर्षी विशेषत: तरुण ग्राहकांना टार्गेट करते ऑनलाइन-एक्सक्लूसिव्ह स्मार्टफोन सीरीज गॅलक्सी-एम लॉन्च केली होती. या सीरीजला भारतातील वाढत्या ऑनलाइन चॅनलमुळे मार्केटमध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठे यश मिळाले. सॅमसंग गॅलक्सी एम21 अॅमेझॉन व्यतिरिक्त काही निवडक रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. कंपनीने 25 फेब्रुवारी रोजी एम-सीरीज मध्ये गॅलेक्सी-एम31 लॉन्च केला. याची किंमत 14,999 रुपये आहे. या फोनला त्याच्या खास फीचर्समुळे मेगा मॉन्स्टर देखील म्हटले जाते. यामध्ये 6000 एमएएचची ब2टरी, 64 मेगापिक्सल क्वाड रिअर कॅमेरा आणि सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे.


भारतीय बाजारात उपलब्ध एम-सीरीज स्मार्टफोनची यादी

गॅलक्सी M10s

3GB|32GB

8,499 रूपये

गॅलक्सी M30

3GB|32GB

4GB|64GB

6GB|128GB

9,649 रूपये

11,499 रूपये

16,999 रूपये

गॅलक्सी M40

6GB|128GB

17,990 रूपये

गॅलक्सी M30s

4GB|64GB

6GB|128GB

12,999 रूपये

14,999 रूपये

गॅलक्सी M31

6GB|64GB

6GB|128GB

15,999 रूपये

16,999 रूपये

X