जाणून घ्या, कशामुळे Samsung M30 आहे इतरांपेक्षा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन

दमदार बॅटरी, ट्रिपल कॅमेरा, sAMOLED डिस्प्ले आणि फुल HD व्हिडीओ एक्स्पीरियंससारखे सर्व फीचर्स 15 ते 20 हजाराच्या रेंजमध्ये हवे असतील तर Sumsung Galaxy M30 एक उत्तम ऑप्शन आहे.

Apr 03,2019 03:08:00 PM IST

सॅमसंगने मार्केटमध्ये आपला M सिरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy M30 लॉन्च केला आहे. हा M सिरीजचा तिसरा स्मार्टफोन असून यापूर्वी सॅमसंगने Galaxy M10 आणि Galaxy M20 लॉन्च केले होते. नुकत्याच लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यामधील ट्रिपल रिअर कॅमेरा, जो उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी देतो. यासोबतच या फोनमध्ये sAMOLED डिस्प्लेसोबत 16. 25 cm स्क्रीन आहे, जी युजरला एक उत्तम स्क्रीन अनुभव देते. चला तर मग जाणून घेऊया, काय खास आहे Galaxy M30 मध्ये, जे या फोनला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन बनवते.


sAMOLED डिस्प्लेने मिळेल अद्भुत अनुभव
Galaxy M30 मध्ये 6.4-inch Super AMOLED full HD+ सोबतच Infinity-U डिस्प्लेसुद्धा आहे. यामुळे तुम्हाला 90% पेक्षा जास्त स्क्रीन रेशो आणि 19.5:9 चा एस्पेक्ट रेशो मिळतो. यामुळे फोनमध्ये गेम्स-मुव्ही पाहण्याचा एक वेगळाच आणि अद्भुत अनुभव मिळतो.100,000: 1 च्या कॉन्ट्रास्ट रेशोमुळे sAMOLED डिस्प्ले प्रत्येक प्रकारच्या प्रकाशात स्वतःला बदलून घेतो, यामुळे व्हिडीओ पाहताना किंवा गेम खेळताना युजरच्या डोळ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण पडत नाही. 15 हजार रुपयाच्या किमतीमध्ये Galaxy M30 एकमेव असा फोन आहे ज्यामध्ये sAMOLED डिस्प्ले मिळतो.


Galaxy M30 मध्ये आहे ट्रिपल रिअर कॅमेरा
सॅमसंग Galaxy M30 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून 13 मेगापिक्सलचा मेन सेन्सर f1.9 अपर्चरमध्ये फोटो क्लिक करतो. 5 मेगापिक्सलसोबतच f2.2 चा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचाच डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये सेल्फी घेण्यासाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तीन सेन्सर असल्यामुळे तुम्ही फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शूटिंग मोडचा लाभ घेऊ शकता. अल्ट्रा वाइड सेन्सरच्या मदतीने उत्तम फोटो क्वालिटी मिळवू शकता. यासोबतच अल्ट्रा वाइड अँगल लेन्सच्या मदतीने तुम्ही 123 अँगल पर्यंतचा व्ह्यू कॅप्चर करू शकता. या कॅमेऱ्यात असलेल्या ब्युटी इफेक्ट फोटो क्लिक करताना उत्कृष्ट ब्युटी सोल्युशन धरतो. केवळ 15 हजार रुपयात ट्रिपल कॅमेरा देणारा एकमेव फोन सॅमसंग Galaxy M30 आहे.


दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग
5000 mAh च्या दमदार बॅटरीसोबतच या फोनमध्ये 3X फास्ट चार्जिंग फिचर आहे. यामुळे कमी वेळामध्ये फोन फुल चार्ज केला जाऊ शकतो. दमदार बॅटरी आणि 3 पट फास्ट चार्जिंगची विशेषता असलेल्या फोनमध्ये तुम्ही एकदा चार्ज केल्यानंतर 105 तास गाणे ऐकू शकता. 31 तास कॉलवर बोलू शकता आणि 25 तासांपेक्षा जास्त व्हिडीओ पाहण्याचा आनंद घेऊ शकता.


Widevine L1 सर्टिफिकेशनमुळे मिळेल फुल HD व्हिडीओ पाहण्याचा आनंद
L3 सर्टिफिकेशन असलेल्या फोनमध्ये तुम्ही फक्त तुम्हाला 540p रिझोल्युशनमध्ये व्हिडीओ पाहू शकता परंतु Galaxy M30 मध्ये Widevine L1 सर्टिफिकेशनमुळे तुम्ही Netflix सारख्या सर्व प्लॅटफॉर्मचे व्हिडीओ हाय डेफिनेशन म्हणजे 720p, 1080p आणि 4k ऑप्शनमध्ये पाहू शकता.


Galaxy M30 में मोबाइल रेडिएशन किंवा SAR स्तर कमीतकमी ठेवण्याकडेसुद्धा विशेष लक्ष देण्यात आले आहे.0.409W / Kg हेड SAR प्रमाण स्मार्टफोनमध्ये कमीत कमी रेडिएशन निर्माण करते आणि या फोनला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन बनवते.


Sleek unibody असलेला हा फोन मार्केटमध्ये 2 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरियंटमध्ये या फोनचे स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. 4जीबी+ 64जीबी असलेला Galaxy M30 तुम्हाला 14,990 च्या किमतीमध्ये मिळेल तर 6जीबी+ 128 जीबी व्हेरियंटचा फोन तुम्ही 17,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.


दमदार बॅटरी, ट्रिपल कॅमेरा, sAMOLED डिस्प्ले आणि फुल HD व्हिडीओ एक्स्पीरियंससारखे सर्व फीचर्स 15 ते 20 हजाराच्या रेंजमध्ये हवे असतील तर Sumsung Galaxy M30 एक उत्तम ऑप्शन आहे. हा फोन तुम्हाला परफॉर्मन्सच्या बाबतीत निराश करणार नाही.


या फोनच्या अधिक माहितीसाठी क्लिक करा
https://www.samsung.com/in/microsite/galaxy-m/m30/


फोन खरेदीसाठी क्लिक करा
https://amzn.to/2SqfNre

X