आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्यावत S Pen, सर्वात मोठ्या स्क्रीनसह सॅमसंगने लाँच केला Galaxy Note 9, जाणून घ्या संपूर्ण फीचर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी नोट सिरीझचे 9 वे स्मार्टफोन गॅलेक्सी नोट-9 लाँच केले आहे. गॅलेक्सी नोट सिरीझमध्ये आतापर्यंतचा हे सर्वात मोठ्या स्क्रीनचे फॅबलेट (Phone+Tablet) आहे. या फोनमध्ये सॅमसंगने 4000 mAh बॅटरी दिली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सॅमसंगने नुकतेच आपल्या गॅलेक्सी सिरीझचे S9 आणि S9+ स्मार्टफोन लाँच केले. परंतु, अपेक्षेप्रमाणे त्यांना ग्राहकांना प्रतिसाद मिळाला नाही. त्याचीच कमतरता Galaxy Note 9 ने भरून निघेल अशी कंपनीची अपेक्षा आहे. सॅमसंग स्मार्टफोनसाठी प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. प्री बुक करणाऱ्यांना सॅमसंग एक स्मार्ट वॉच (सॅमसंग गिअर) अवघ्या 4,999 रुपयांत देणार आहे.


आता S Pen मध्ये Bluetooth, स्मार्टफोन रिमोट
सॅमसंगने आपल्या प्रत्येक गॅलेक्सी नोट स्मार्टफोनमध्ये एक स्टायलस दिले आहे. S Pen म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्टायलसचा गॅलेक्सी एस-9 मध्ये सुद्धा समावेश करण्यात आला आहे. परंतु, हा स्टायलस आतापर्यंतचा सर्वात आधुनिक आहे. यामध्ये ब्लुटूथ कनेक्शन देण्यात आले आहे. जेणेकरून त्याचा वापर स्मार्टफोनचे रिमोट म्हणून करता येईल. कुठलेही व्हिडिओ, युट्यूब अॅप आणि इतर फंक्शन फोनला हात न लावता कंट्रोल करता येतील. या स्टायलसचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यातून फोटो आणि सेल्फी क्लिक करता येईल. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, किंमत आणि संपूर्ण फीचर्स...

बातम्या आणखी आहेत...