Home | Business | Gadget | Samsung giving bestday offer on all electronic items

सँमसंगचे स्मार्टफोन मिळत आहेत स्वस्त, TV, फ्रिजवरही 10 हजार रुपयांचा मिळत आहे डिस्काउंट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 10, 2018, 02:12 AM IST

स्मार्टफोनवर 9 हजार रूपयांपर्यंतची सुट

 • Samsung giving bestday offer on all electronic items

  गॅजेट डेस्क- सध्या सँमसंगची बेस्टडेज सेल चालु आहे. यात 9 हजार रुपयापर्यंतचे एक्सचेंज बेनिफिट मिळत आहे. त्यासोबतच कॅश डिस्काउंटही मिळत आहे. 31 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये Samsung Galaxy Note 9, Galaxy S9+ आणि Galaxy A9 (2018) सारख्या फोनवर देखील एक्सचेंज बेनिफिट्स मिळत आहेत. तर Galaxy A7 (2018) स्पेशल प्राइजमध्ये उपलब्ध आहे. कस्टमर्स ईएमआयने देखील पे करू शकतात. त्यासोबतच एचडीएफसी बँक कार्ड यूजर्सना एक्स्ट्रा कॅशबॅक मिळत आहे.

  कोणता स्मार्टफोन मिळत आहे स्वस्त
  - 23,990 रुपये वाला Samsung Galaxy A7 (2018) वर 2 हजार रुपयांचा स्पेशल डिस्काउंट मिळत आहे.
  - Galaxy S9+ वर 9 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे.
  - Galaxy A9 वर 4 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे.
  - Galaxy On8 14,990 रुपयात उपलब्ध आहे. तर Galaxy On7 Pro 6,990 रूपयात मिळत आहे.

  TV वरही मिळत आहे डिस्काउंट
  - फोनसोबतच टीवीवरही कंपनी डिस्काउंट देत आहे. 33,900 रुपयांची 80cm(32") N4300 Smart HD TV 28,700 रुपयात मिळत आहे.
  - या प्रकारेच टीवी, फ्रिज आणि इलेक्ट्रॉनिक अॅसेसरीजवर कंपनी डिस्काउंट देत आहे.
  - फ्रिजवर 7 हजार रूपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

Trending