आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या ग्राहकांकडे लक्ष देण्याबाबत सॅमसंग ठरले भारतात अव्वल ब्रँड; टीआरए संस्थेचा अहवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी सॅमसंग भारतात ग्राहकांची काळजी घेण्याबाबत देशातील अव्वल क्रमांकाची कंपनी ठरली आहे. मानांकन संस्था टीआरएच्या वतीने जाहिर करण्यात आलेल्या या ताज्या क्रमवारीत या दक्षिण कोरियातील कंपनीने एकाच वर्षात आठ क्रमांकांची सुधारणा केली आहे. २०१८ च्या यादीमध्ये सॅमसंग आठव्या क्रमांकावर होती. टाटा मोटर्सला दुसरा क्रमांक मिळाला आहे. टाटा समूह मागील वर्षी पहिल्या क्रमांकावर होता. 

 

अॅपल तिसऱ्या, हीरो मोटोकॉर्प चौथ्या आणि नाइकी पाचव्या क्रमांकावर  
या वेळी प्रत्येक श्रेणीला वेगवेगळी रँकिंग देण्यात आली आहे. एकंदरीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली टाटा मोटर्स चारचाकी निर्माता कंपन्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर व्यावसायिक वाहनांमध्ये आयशर मोटारला पहिला क्रमांक मिळाला आहे. अल्कोहोलिक बेव्हरेज ब्रँडमध्ये बडवाइजर पहिल्या क्रमांकावर आहे. 

 

बँकिंगमध्ये एलआयसी प्रथम क्रमांकावर
बँकिंग, फायनान्स सेवा आणि विमा या क्षेत्रामध्ये एलआयसी पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे. एलआयसीला एकंदरीत सर्व कंपन्यांच्या यादीमध्ये सहावा क्रमांक मिळाला आहे. यामध्ये एचडीएफसी दुसऱ्या तर स्टेट बँक ऑफ इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. खासगी बँकांमध्ये एचडीएफसी पहिल्या आणि कोटक महिंद्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीआयसीआय बँकेला तिसरे स्थान मिळाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या यादीत स्टेट बँक पहिल्या क्रमांकावर आहे. पंजाब नॅशनल बँक दुसऱ्या आणि बँक ऑफ इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक सेवा क्षेत्रात मुथूट फायनान्स पहिल्या आणि सुंदरम फायनान्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्युच्युअल फंडामध्ये यूटीआयला आणि व्हेंचर कॅपिटलमध्ये सॉफ्ट बँकेला पहिला क्रमांक मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...