आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 जानेवारीला लाँच होणार Samsung चे खास स्मार्टफोन, दमदार बॅटरी, डिस्प्ले आणि कॅमेराने सुसज्ज; कमी किमतीत मिळणार इतके फीचर्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : साउथ कोरियाची दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग 28 जानेवारी 2019 रोजी आपल्या नवीन M-series च्या तीन स्मार्टफोनला लाँच करत आहे. हे फोन दमदार फीचर्ससह सुसज्ज असून तरुणाईला आकर्षित करणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे. कंपनीने या फोनची किंमत देखील कमी ठेवली आहे. आपल्या कमी किमतीमुळे हे फोन शाओमीला टक्कर देऊन शकतात. 5 मार्चपासून Amazon India आणि Samsung Online Shop वरून या फोनची खरेदी करता येणार आहे. 
 
असे असणार हे तीन फोन
M-10 ची किंमत 9,500 रूपये आणि M-20 ची किंमत 15,000 रूपये असणार आहे. या दोन्ही फोनमध्ये इनफिनिटी-वी डिस्प्ले असणार आहे. याआधी इतक्या कमी किमतीमध्ये हे फीचर भेटले नाही. तिसरा फोन M-30 मध्ये 3 रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. M-series सर्वप्रथम भारतात लाँच होणार आहे. भारतातली लाँच नंतर इतर बाजारपेठेत ते दाखल होणार आहे. 

 

दमदार बॅटरीसह सुसज्ज
Galaxy M-30 मध्ये 5,000 mAh ची बॅटरी आहे. याआधी कोणत्याही सॅमसंग फोनमध्ये इतक्या पॉवरची बॅटरी पाहण्यात आली नाही. तर M-20 मध्ये 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. आतापर्यंत सॅमसंगच्या फोनमध्ये इतक्या कमी किमतीत एवढे फीचर्स मिळाले नव्हते. स्वस्त स्मार्टफोनच्या बाजारावर आपली पकड मजबूत करण्यासाठी कंपनीने या सिरीजला तयार केले आहे. 

 

शाओमीला देणार टक्कर 
स्वस्त आणि मध्यम रेंजच्या फोनसाठी रेडमी सिरीज भारतामध्ये यशस्वी झाली आहे. आता सॅमसंग देखील आपले नवे फोन या रेंजमध्ये दाखल करून शाओमीला टक्कर देण्याची योजना आखत आहे. तज्ज्ञांच्या मते हार्डवेअरच्या दृष्टीने सॅमसंगने आपले डिस्प्ले, कॅमेरा, मेमोरी आणि कनेक्टिव्हीटी टेक्नॉलोजीमध्ये पकड ठेवलेली आहे. पुढील काळात हे एम-मॉडल विश्वस्तरावर शाओमीपेक्षा अधिक चांगले ठरू शकतात. 
 

बातम्या आणखी आहेत...