• Home
  • Business
  • Gadget
  • samsung launches new Samsung Galaxy M40 with Qualcomm Snapdragon 675 processor with great performance

new gadget / नवीन Samsung Galaxy M40, यात मिळेल जबरदस्त परफॉर्मंस असलेले Qualcomm Snapdragon 675 प्रोसेसर आणि बरेच फीचर्स


'स्क्रीन साउंड टेक्नोलॉजी' सारखे फीचर्स आहेत या फोनमध्ये

दिव्य मराठी वेब

Jun 21,2019 09:43:21 AM IST

गॅजेट डेस्क- Samsung ने आपल्या Galaxy M सीरीजमध्ये आणखी एक नवीन फोन Samsung Galaxy M40 लॉन्च केला आहे. याआधी या सीरीजमध्ये कंपनीने Galaxy M10, M20 आणि M30 लॉन्च केले होते. Amazon च्या फेब्रुवारी-मार्च 2019 च्या सेल्स डेटानुसार Samsung चे M सीरीज फोन्स सगळ्यात जास्त विकले गेले आहेत. 20 लाख ग्राहकांसोबत Samsung M सीरीज स्मार्टफोन्स टॉपवर आहे. अनेक नवीन फीचर्स असलेल्या Samsung चा नवीन Galaxy M40 फोन याच्या फीचर्सचा विचार केला तर अतिशय कमी किमतीत मिळत आहे. जाणून घ्या फोनबद्दल...

Galaxy M40 स्मार्टफोनची सगळ्यात महत्तावाची बाब म्हणजे इन्फिनिटी O डिस्प्ले. या फोनमध्ये 91.8% चा स्क्रीन रेशियो आहे. त्यासोबतच 2340 x 1080 FHD+ क्रिस्टल क्लिअर डिस्प्ले, गेम खेळणे आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव द्विगुणीत करतो. त्योसोबत यात दमदार कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देखील आहे. 20 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीवाल्या या फोनमध्ये इन्फिनिटी O डिस्प्ले आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेसंरसोबत फेस अनलॉकदेखील आहे.


जबरदस्त परफॉर्मंस
जे लोक फोन परफ़ोर्मस आणि गेमिंग एक्सपीरिएन्ससाठी विकत घेतात त्यांना Galaxy M40 एक चांगला पर्याय आहे, कारण या फोनमध्ये यूझर्सला 11nm प्रोसेस वाला लेटेस्ट जनरेशनचे Octa-core Qualcomm Snapdragon 675 प्रोसेसर मिळते. Galaxy M40, Chaebol कडून M सीरीजचा हा पहिला असा फोन आहे ज्यात Snapdragon SoC उपलब्ध आहे. हा Snapdragon 6 सीरीजमधील नवीन चीप आहे. या चीपसोबत Qualcomm Adreno 612 GPU चे प्रोसेसर दिले आहे, जे टास्कदरम्यान अल्ट्रा-फास्ट गती देते. या ग्राफिक्स चिपने स्मार्टफोनची गेमिंग आणखी चांगली करता येते. Galaxy M40 ची कुशलता त्याच्या 1,74,784 च्या जबरदस्त AnTuTu बेंचमार्क स्कोरनेच कळते. याच्या सोबतच Galaxy M40 ने क्रॉस प्लॅटफॉर्म प्रोसेसर बेंचमार्क Geekbench नुसार, सिंगल-कोर टेस्टमध्ये 2,404 चा स्कोर आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 6,704 चा स्कोर मिळवला आहे, जो या फोनच्या जबरदस्त परफोर्मसने कळते. या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे, जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. यासोबतच फोनमध्ये हायब्रिड सिम स्लॉटदेखील आहे.


ट्रिपल रिअर कॅमरा
Galaxy M40 मध्ये ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप आहे, ज्यात 32 मेगापिक्सलचा मेन रिअर कॅमरा आहे. तो F1.7 अपर्चरमध्ये फोटो क्लिक करतो आणि कमी लाइटमध्येही पिक्चर क्वालिटी चांगली येते. त्यासोबतच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलमध्ये F2.2 अपर्चरसोबतच डेप्थ सेंसर आणि लाइव्ह फोकस दिला आहे. यात सेल्फी घेण्यासाठी 16 मेगापिक्सलचा F2 अपर्चर वाला फ्रंट कॅमरा आहे. तीन सेसंर असल्यामुळए युझर्स वेगवेगळ्या मोडने शुटींग करू शकतात. अल्ट्रा वाइड सेंसरच्या मदतीने चांगले फोटो काढता येतात, त्यासोबच अल्ट्रा- वाइड अँगल लेंसच्या मदतीने 123 डिग्री अँगलपर्यंतचा व्ह्यू कॅप्चर करता येतो. त्यासोबच अॅडव्हान्स AIकॅमरा उत्कष्ट ब्यूटी आणि स्क्रीन सॉल्यूशंस देतो.


Galaxy M40 मध्ये 4k व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळते तसेच हायपरलॅप्ससारखे फीचर्स असल्यामुळे टाइम-लॅप्सला कॅप्चर करता येते. UHD व्हिडिओ रेकॉर्डिंगसोबत सुपर स्लो-मोशनचे फीचरदेखील देण्यात आले आहे. अल्ट्रा वाईड अॅगलच्या कॅमेरामुळे चांगल्या प्रकारचे पॅनारॉमा शॉट काढता येतात.


भरपूर एंटरटेन्मेटसाठी Widevine L1 सर्टिफ़िकेशन
M40 फोन Widevine L1 सर्टिफ़िकेशनसोबत येतो. Netflix आणि Amazon prime सारख्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ 720p आणि 1080p ऑप्शनमध्ये पाहता येतात. M40 सोबत Dolby ATMOS हेडफोन्सदेखील येतात.


M40 फोनची बॉडी आणि डिझाइन
हा स्मार्टफोन 7.9 एमएमच्या स्लीक डिझाइन आणि ड्यूयल टोन फिनिशमध्ये येतो. यात मिडनाइट ब्लू आणि सीवॉटर ब्लू असे रंग उपलब्ध आहेत. हे कलर ऑप्शंस तरूणांना खूप आवडतात. हा फोन पावरफुल UX आणि UI डिझाइनमध्ये आहे. यासोबतच हा M सीरीज चा पहिला असा डिव्हाइस आहे, ज्यात Android Pie आणि OneUI ची सुविधा आहे. या फोनमध्ये Proximity, Geomagnetic, Fingerprint, Gyro, Accelerometer, Virtual Lite सारखे स्मार्ट ऑप्शन आहेत.


'स्क्रीन साउंड टेक्नोलॉजी'मुळे स्क्रीनला स्पीकर्समध्ये बदलता येते. या फीचरची सगळ्यात चांगली बाब म्हणजे कॉल आल्यावर फोन इन-कॉल स्पीकर्सप्रमाणे काम करतो. कॉल आल्यावर फोनच्या कोणत्याही भागावर टच करून कॉल करता येतो.

तुम्हालाही नवीन फोन घ्यायचा आहे, तर मग Samsung Galaxy M40 तुम्हला निराश करणार नाही. 19,990 रूपयांत मिळाणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला आवडणारे सगळे फीचर्स उपलब्ध आहेत. हा फोन तुम्ही 24x7 Amazon वर खरेदी करू शकता.

Samsung ई स्टोरवरून फोन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा...

अमॅझॉनवरून फोन खरेदी करण्यासाटी येथे क्लिक करा...

X
COMMENT