Interview / नियुक्तीनंतरही सॅमसंग कर्मचाऱ्यांना देते काैशल्य विकासाचे प्रशिक्षण, कंपनीच्या विद्यापीठात १३ हजारपेक्षा जास्त अभ्यासक्रमांची सज्जता

सॅमसंगचे एचआर प्रमुख, वरिष्ठ उपाध्यक्ष समीर वाधवान सांगत आहेत राेजगाराच्या नव्या संधी

दिव्य मराठी नेटवर्क

Aug 25,2019 09:42:00 AM IST

नवी दिल्ली - टीव्ही, फ्रिज, वाॅशिंग मशीन, मोबाइल फोन यांसारख्या कंझ्युमर ड्युरेबल्सची विक्री वर्षाला ९ ते १० % दराने वाढत आहे. इन्व्हेस्ट इंडियाच्या अहवालानुसार १०० % एफडीआयमुळे गेल्या १० वर्षांत ४६.८ हजार काेटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. २०२२ पर्यंत ८ लाख नवीन राेजगार निर्माण हाेऊ शकतात. नाेकरी आणि करिअरच्या संधींबाबत ‘दिव्य मराठी’ने सॅमसंग इंडियाचे एचआर प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष समीर वाधवान यांच्याशी चर्चा केली.


> सध्याच्या काळात युवकांसाठी कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये काेणत्या प्रकारचे राेजगार उपलब्ध आहेत?
भारतीय कंझ्युमर ड्युरेबल बाजारात विविधता आहे. त्यामुळे राेजगारातही विविधता आहे. अलीकडेच पदवीधर झालेल्या फ्रेशर्ससाठी या क्षेत्रात क्वालिटी कंट्राेल ऑफिसर, फील्ड सुपरवायझर, प्लँट सुपरवायझर, प्राॅडक्शन इंजिनिअर, प्राॅडक्शन मॅनेजर, आर्टिझन, इंजिनिअरिंग जाॅब्स, सेल्स, मार्केटिंग, कस्टमर सर्व्हिस आणि लॉजिस्टिक्स यामध्ये माेठ्या संधी आहेत.


> विविध पदांसाठी काय पात्रता हवी?
अशा कर्मचाऱ्यांची गरज आहे जे कंपनीच्या संस्कृतीमध्ये चपखल बसू शकतील. तंत्रज्ञानाबराेबर मैत्री करू शकतील. डिजिटल आणि साेशल मार्केटिंग, इंटरनेट आॅफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बायाेमॅट्रिक्ससारख्या नव्या शैलीनुसार विशेष तज्ज्ञांची मागणी वाढत आहे.


> तुमची कंपनी कॅम्पस प्लेसमेंट वा जाॅब साइट‌्समध्ये सहभागी हाेते का?
मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स, आयटी, सप्लाय चेन, खरेदी, फायनान्स व अकाउंट, लीगल, मार्केटिंग, ब्रँडिंग, कम्युनिकेशनसारख्या अनेक कामांमध्ये वेगवेगळ्या काैशल्यांची गरज असते. व्यवस्थापकीय पदांसाठी प्रवेश पातळीवरील भरतीकरिता सर्वाेत्कृष्ट संस्थांचा दाैरा केला जाताे. जाॅब बाेर्ड आणि साेशल मीडिया साइट्सचाही उपयाेग केला जाताे.


> नाेकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी कशा प्रकारे तयारी करावी?
संबंधित कंपनी आणि आपल्या कामाची पूर्ण तयारी करा. युवकांनी भविष्याच्या दृष्टीने आपले काैशल्य विकसित करण्याचे मी आवाहन करीन. स्पर्धासाठी तयार राहा. नाेकरीच्या बाजारात कनेक्टिव्हिटी आणि माेबिलिटीचे प्रमुख स्थान आहे हे युवकांनी समजून त्यावर विशेष लक्ष द्यावे.


> नाेकरीच्या जास्त संधी मिळवण्यासाठी युवकांनी काेणत्या क्षेत्रावर लक्ष द्यावे?
डाेमेन विशेषज्ञ रूपाने आपण स्वत:ला विकसित करा. आता उद्याेग गिग (जीआयजी) इकाॅनाॅमीकडे वाटचाल करत आहे. ज्यामध्ये उमेदवारांना त्यांतील काैशल्यानुसार कामावर ठेवले जाईल. त्यासाठी उमेदवारांनी भविष्यातील काैशल्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जे असंघटित आणि विविध क्षेत्रांतील लाेकांबराेबर काम करण्याच्या दृष्टीने मदतनीस ठरू शकते. व्यावसायिक संघ भावना मल्टी टास्कची क्षमताही असावी.


> इंजिनिअरिंग अजूनही विद्यार्थ्यांसाठी संबंधित क्षेत्र आहे असे तुम्हाला वाटते का?
आतापर्यंत कला आणि विज्ञानाला महत्त्व आहे. इंजिनिअरिंग केवळ संबंधितच नाही, तर उद्याेगासाठी एक आवश्यक आधार आहे. नेट हायरिंगमध्ये भलेही बदल झाला नसेल, पण हायरिंगच्या प्रकारामध्ये निश्चित बदल झाला आहे. एआय, मशीन लर्निंग आणि राेबाेटिक्ससारख्या क्षेत्रात डेटा संशाेधक आणि तज्ज्ञांच्या वाढत्या मागणीबराेबरच इंजिनिअर तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतील.


> अलीकडच्या वर्षात भरती प्रक्रिया बदलली आहे का?
डिजिटलायझ‌ेशन गेम चेंजर सिद्ध झाले आहे उमेदवारांचा अनुभव पारखण्यासाठी कंपन्या नवीन आयटी टूल्स आत्मसात करत आहेत. नवीन पिढी नाेकरीच्या संधींचा शाेध घेण्यासाठी साेशल मीडियाचा उपयाेग करत आहेत. उमेदवारही कंपन्यांचे मूल्यांकन करून तेथे जाण्याचा निर्णय घेतात.


> सॅमसंग युनिव्हर्सिटी नेमकी काय आहे?
नावावरूच कळते की ‘सॅमसंग युवा सॅमसंग युनिव्हर्सिटी’ विशेष करून एक डिजिटल लर्निंग प्लॅटफाॅर्म आहे. ही आमच्या कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी मदत करते. यामध्ये १३,००० पेक्षा जास्त अभ्यासक्रम आहेत. सॅमसंग युवाच्या माध्यमातून कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत आणि बाह्य स्रोतांपासून ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्राेत्साहित करते.


२६.७ % दराने वाढत आहे इलेक्ट्राॅनिक हार्डवेअरचा व्यवसाय
> आयबीआयएफच्या अहवालानुसार जगात कंझ्युमर ड्युरेबलचा वापर ३०% आहे, जाे भारतात आताही केवळ ४% आहे. याचा अर्थ अजूनही संधी आहे.
> एस अँड पी बीएसई कंझ्युमर ड्युरेबल निर्देशांकाचा वृद्धिदर १६% आहे.
> इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरचा २०१८ मध्ये ३.८८ लाख काेटींचा व्यवसाय झाला. त्याचा वृद्धिदर २६.७ % आहे.
> निर्यातीमध्ये सातत्याने वाढ हाेत आहे. वर्ष २०२४ पर्यत निर्यात ४० हजार काेटी डाॅलरपर्यंत जाऊ शकताे.
> वार्षिक १४.५ % वृद्धिदरात वर्ष २०२२ पर्यंत स्मार्टफाेनचे ८२.९ काेटी युजर्स हाेतील.


या क्षेत्रात आहेत राेजगाराच्या संधी

> मॅन्युफॅक्चरिंग

> सेल्स >

आयटी

> सप्लाय चेन

> खरेदी

> फायनान्स व अकाउंट

> लीगल मार्केटिंग

> ब्रँडिंग कम्युनिकेशन

> प्राॉडक्शन

> मॅनेजर

> आर्टिझन

> इंजिनिअरिंग नाेकऱ्या

> ग्राहक सेवा

>लाॅजिस्टिक

> मशीन आॅपरेटर

> प्राॅडक्शन इंजिनिअर

> क्वालिटी कंट्राेल

> प्लँट सुपरवायझर

> फिल्ड सुपरवायझर

> फ्रंट आॅफिस नाेकऱ्या

X
COMMENT