आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung लवकरच भारतात रोटेटिंग कॅमरा असलेला स्मार्टफोन Galaxy A80 ला करणार लॉन्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- सॅमसंग भारतात रोटेटिंग कॅमरे असलेला स्मार्टफोन Galaxy A80 ला जुलैमध्ये लॉन्च करणार आहे. Galaxy A80 मध्ये तीन कॅमरे असतील, ज्यातील एक 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 प्रायमरी सेंसर असलेला कॅमेरा आहे, त्यानतर एक अल्ट्रा वाइड कॅमरा आणि तिसरा 3D डेप्थ कॅमरा.  

 

फीचर्स 
Samsung Galaxy A80 एक फुल स्क्रीन स्मार्टफोन आणि आणि सेल्फीसाठी तोच रोटेटिंग कॅमरा आहे जो रिअर कॅमराप्रमाणेच काम करेल. स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच एमोलेड डिस्पले मिळेल. तसेच यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. परफॉर्मंससाठी यात Qualcomm Snapdragon 730G प्रॉसेसर देण्यात आले आहे. तसेच 3,700mAh बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  Android बेस्ड One UI सिस्टीमवर हा फोन काम करतो.


सॅमसंग भारतावर लक्ष केंद्रित करणार
साउथ कोरियाची कंपनी सॅमसंगने भारताला पसंती देत, त्यांचे फोन्स इंडिया फर्स्ट असतील असे सांगितले. कंपनीच्या इनोवेशन प्रोडक्ट प्लानिंग ग्रुपचे हेड किंग यांनी सांगितले की, भारत एक मोठे मार्केट आहे, जे वेगाने बदलत आहे. त्यामुळेच भारत आमच्यासाठी खास आहे. भारतात आम्ही मागील काही दिवसात एका मागे एक अनेक डिव्हाइस लॉन्च केले आहेत. सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच M सीरीजला लॉन्च केले. या सीरिजचे फोन 20 हजरांच्या रेन्जमध्ये उपलब्ध आहेत.