Home | Business | Gadget | samsung unveils its first foldable smartphone in sdc 2018

सॅमसंगने सादर केला भारतातला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, 7.3 इंचांचा मेन डिस्प्ले फोल्ड करुन 4.6 इंचच्या फोनसारखा वापरा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 04:41 PM IST

या स्मार्टफोनमध्ये 7.3 इंच डिस्प्ले असून 4.6 इंचापर्यंत फोनला फोल्ड केले जाऊ शकते.

 • samsung unveils its first foldable smartphone in sdc 2018

  दक्षिण कोरिया- सॅमसंग कंपनीने न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या डेव्हलपर कॉन्फरन्स(SDC 2018) मध्ये पहिला फोल्डेबल स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनचे नाव आणि किंमतीबद्दल मात्र गुप्तता बाळगण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 7.3 इंच डिस्प्ले असून तो 4.6 इंचापर्यंत फोल्ड करता येतो.

  उभा फोल्ड करता येणाह स्मार्टफोन

  > सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनची वैशिष्ट्ये म्हणजे या फोनला व्हर्टीकली (उभे) फोल्ड करता येते. 7.3 इंच डिस्प्लेचे रेझल्युशन 1536X2152 असून 4.6 इंच स्क्रीनचे रेझल्युशन 840X1960 असेल.

  एकाच वेळी वापरा तीन अॅप्स

  > या फोनमध्ये सॅमसंगने सिंगल यूआय (यूजर इंटरफेस)चा वापर केला आहे. सॅमसंग कंपनीने सांगितल्यानुसार, या स्मार्टफोनमध्ये एकच यूआय असल्यामुळे युझर्स मल्टीटास्किंग करू शकतात. या फोनचा टॅबलेटसारखा वापर केल्यास एका वेळी तीन अॅप्स वापरता येऊ शकतात.

  पुढच्या वर्षी होणार लाँच

  > डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये (SDC 2018) या फोल्डेबल फोनची घोषणा केली असून तो पुढच्या वर्षी लाँच होणार असल्याचे सांगण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार सॅमसंग पुढील वर्षी गॅलेक्सी-सिरिजच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त Galaxy S10 लाँच करण्याच्या तयारीत असून फोनची लाँच झाल्यानंतर फोल्डेबल स्मार्टफोनची लाँचिंग होणार आहे.

  जगातील पहिला फोल्डेबल फोन झाला आहे लाँच

  गेल्या आठवड्यात अमेरिकन स्टार्ट-अप कंपनी Royole यांनी जगातील पहिला स्मार्टफोन FlexPai लाँच केला आहे. या फोनमध्येदेखिल 7.8 इंचांचा डिस्प्ले असून या फोनला 4 इंचांपर्यंत फोल्ड करुन वापरता येऊ शकतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8150 प्रोसेसरसह 8 जीबी रॅम आणि 16+20 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

 • samsung unveils its first foldable smartphone in sdc 2018
 • samsung unveils its first foldable smartphone in sdc 2018
 • samsung unveils its first foldable smartphone in sdc 2018

Trending