Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | Samudra Manthan Amrut Kalash Is Really Found In Indonesia!

समुद्रमंथनानंतर कुठे गायब झाला अमृत कलश? या ठिकाणी आहे हे ऐतिहासिक रहस्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 29, 2018, 12:03 AM IST

या कलशातील द्रव पदार्थ हजारो वर्षे उलटूनही सुकलेला नाही

 • Samudra Manthan Amrut Kalash Is Really Found In Indonesia!

  इंडोनेशिया - मुस्लिम देश इंडोनेशियामध्ये एक असे मंदिर आहे, जेथे अमृत कलश असल्याचा दावा केला जातो. कुंडू सुकूह नावाच्या या प्राचीन मंदिरात असा एक कलश आहे ज्यात एक द्रव्य गेल्या अगणित वर्षांपासून आहे. त्याबद्दल असा दावा केला जातो की, हे अमृत असून हजारो वर्षे उलटूनही सुकलेले नाही. या कलशात एक शिवलिंगही आहे.

  असा सापडला हा कलश..

  या मंदिराच्या एका भिंतीवर महाभारताचे आदिपर्व लिहिलेले आहे. 2016 मध्ये येथे पुरातत्त्व विभाग डागडुजीचे काम करत होते, तेव्हा त्यांना या भिंतीच्या पायथ्याला अशी एक गूढ वस्तू आढळली. या वस्तूद्वारेच त्यांना या जागेची सखोल माहिती मिळाली.

  - त्यानंतर एक्सपर्टच्या टीमला तांब्याचा एक कलश मिळाला, ज्यात एक पारदर्शी शिवलिंग होते. यात एक खास द्रव पदार्थ भरलेला होता. रिसर्चमध्ये कळले की, तांब्याच्या भांड्याला अतिशय सफाईदारपणे जोडण्यात आलेले आहे, जे आजच्या प्रगत तंत्रज्ञानाद्वारेही कठीण आहे. यामुळे ते कुणालाच उघडता येऊ नये, यासाठी ही तरतूद केलेली असावी. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे जिथे हे सापडले, त्याच ठिकाणी समुद्र मंथनाचा नकाशा कोरलेला आहे. या ठिकाणी खजुराहोप्रमाणे अनेक मूर्ती आणि एका भिंतीवर आदिपर्व लिहिलेले असणे अजूनच आश्चर्य निर्माण करणारे ठरते.

  12 व्या शतकाशी आहे नाते..
  - या कलशाची कार्बन डेटिंग 12व्या शतकाची सांगितली जात आहे. त्या काळात इंडोनेशिया संपूर्णपणे हिंदू राष्ट्र होते, पण 15व्या शतकात जेव्हा इस्लामी आक्रमकांपासून या राष्ट्राला धोका निर्माण झाला तेव्हा या मौल्यवान वस्तूंना या मंदिरात लपविले गेले. या कलश आणि शिवलिंगासोबत अनेक मौल्यवान रत्नेही मिळाली असल्याचे सांगितले जाते.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या संबंधित आणखी Photos...

 • Samudra Manthan Amrut Kalash Is Really Found In Indonesia!
 • Samudra Manthan Amrut Kalash Is Really Found In Indonesia!
 • Samudra Manthan Amrut Kalash Is Really Found In Indonesia!
 • Samudra Manthan Amrut Kalash Is Really Found In Indonesia!
 • Samudra Manthan Amrut Kalash Is Really Found In Indonesia!

Trending