Home | National | Other State | San Francisco becomes first U.S. city to ban police use of face recognition technology

फेस रिकग्नीशन बॅन करणारे पहिले शहर बनले सॅन फ्रांसिस्को, पोलिसदेखील नाही करू शकणार वापर

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 04:09 PM IST

सॅन फ्रांसिस्को असेंबलीमध्ये 8-1 ने पास झाले बिल, पुढील आठवड्यात अजून व्होटिंग करून कायदा बनवण्यात येईल

  • San Francisco becomes first U.S. city to ban police use of face recognition technology

    वॉशिंग्टन- अमेरिकेच्या सॅन फ्रांसिस्कोमध्ये फेस रिकग्नीशन तंत्रज्ञानाचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मंगळवारी असेंबलीमध्ये 8-1 च्या अंतराने पास झालेल्या बीलानंतर हे निश्चित करण्यात आले की, या तंत्रज्ञानाला आता वापरता येणार नाही. म्हणजेच आता स्थानीक एजंसि, पोलिस आणि ट्रॅफिकमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांना पकडले जाणार नाही.

    त्याशिवाय येणाऱ्या काळात नागरीकांना सर्विलंस तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठीह शहरातील अधिकाऱ्यांची परवागनी घ्यावी लागेल. फेस रिकग्नीशनच्या वापराविरूद्ध असलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणने आहे की, सध्याच्या तंत्रज्ञानात खूप कमतरता आहे, ज्यामुळे याची विश्वासहार्यता कमी होते. त्यासोबतच यामुळे लोकांच्या खासगी आयुष्यातही प्रभाव पडतो.


    पुढील आठवड्यात दुसऱ्या व्होटींगसाठी सादर होईल बिल
    दुसरीकडे या तंत्रज्ञानाच्या बाजूने बोलणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणने आहे की, फेस रिकगनीशन बॅन केल्याने सामान्या नागरिकांच्या सुरक्षेवर त्याचा प्रभाव पडले, यामुळे गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची ताकद कमी होईल. आता या बिलच्या दुसऱ्या व्होटींसाठी बिल पास करणे बाकी आहे. हे बिल पास झाल्यानंतरच याचा कायदा बनवण्यात येईल. पण नवीन नियम सॅन फ्रांसिस्कोचे एअरपोर्ट आणि बंदरावर लागू होणार नाहीत, काहण दोन्ही केंद्राच्या ट्रम्प सरकारच्या अंतर्गत येतात.

Trending