आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाकिस्तानी महिला क्रिकेटरची एम एस धोनीसोबत एक दिवस घालवण्याची इच्छा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क : पाकिस्तानची महिला क्रिकेटर सना मीर नुकतीच वनडे गोलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली आहे. 32 वर्षीय सना आयसीसी वनडेच्या क्रमवारीत अव्वल गाठणारी पाकिस्तानची पहिली महिला खेळाडू बनली आहे. सनाने 663 गुणांसह ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटला (660) मागे सोडले. पाकिस्तानची महिला टी20 आणि वनडे कर्णधार सनाने 112 वनडे मॅचमध्ये 136 विकेट घेतल्या असून टी20 मध्ये 76 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच वनडेमध्ये 1558 आणि टी20 मध्ये 757 धाव काढल्या आहेत.


व्यक्त केली ही इच्छा 
नंबर वन गोलंदाज ठरण्यापूर्वी सना मीरला पाकिस्तानमध्ये एका मुलाखतीदरम्यान प्रसिद्ध क्रीडा पत्रकार जेनब अब्बास यांनी काही रंजक प्रश्न विचारले. यामध्ये एक प्रश्न असा होता की, कोणत्या क्रिकेटरसोबत तुला दिवसभर राहण्याची इच्छा आहे. यावर सनाने भारताचे विकेटकिपर आणि माजी कर्णधार एम एस धोनीचे नाव घेतले. या व्यतिरिक्त सनाने पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांचेही नाव घेतले.


एका पोस्टमुळे आली चर्चेत
सना मीर काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चेत आली होती. सनाने हेअर रिमुव्हल क्रीम आणि फेअरनेस क्रीमविरुद्ध रोष व्यक्त केला होता. सनाने अशाप्रकारच्या जाहिरातीविरुद्ध फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहिली होती, यामध्ये सनाने लिहिले होते की, ती कधीही हेअर रिमुव्हल क्रीम आणि फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करणार नाही. खेळामध्ये पुढे जाण्यासाठी तरुण मुलींना तिने मॅसेज दिला की, खेळात स्मूथ आर्म्स नाही तर स्ट्रॉंग आर्म्स हवेत.

बातम्या आणखी आहेत...