आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भाभीजी घर पर है' फेम विनोदवीर सानंद वर्मा साकारणार नकारात्मक भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : विनोदवीर सानंद वर्माने 'भाभीजी घर पर हैं' मालिकेतून आपली ओळख निर्माण केली. तो विशाल भारद्वाजच्या आगामी 'पटाखा' चित्रपटात नकारात्मक भूमिका करणार आहे. त्याच्याकडे आणखी चार चित्रपट आहेत 


विशाल भारद्वाज नेहमीच आपल्या चित्रपटात काही ना काही प्रयोग करत असतात. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मकबूल' मध्ये गंभीर भूमिका साकारणाऱ्या अभिनेते नसीरूद्दीन शाह आणि ओमपुरीकडून कॉमेडी करून घेतली होती. आता अशाच प्रकारचा वेगळा प्रकार ते आपल्या आगामी पटाखा चित्रपटात करणार आहेत. या चित्रपटात ते टीव्हीची लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर हैं' मध्ये अनोखे लाल सक्सेनाची भूमिका साकारणाऱ्या सानंद वर्मा यांना घेणार आहेत. 

याविषयी सानंदने सांगितले..., 'प्रेक्षक आजदेखील मला वेड्या सक्सेनाच्या भूमिकेत पाहून हसतात. मात्र 'पटाखा' मध्ये पहिल्यांदाच ते मला धोकादायक भूमिकेत पाहतील. चित्रपटात मी पटेल सेठ नावाच्या व्यक्तीची भूमिका करणार आहेत, तो पैसे देऊन नवरी विकत घेत असतो. लोकांना माझी ही वेगळी भूमिका नक्कीच आवडेल, अशी अपेक्षा करतो. 

 

सूत्राच्या माहितीनुसार, सानंदला गेल्या वर्षीच घेण्यात आले होते. मात्र तेव्हा विशाल सपना दीदी बायोपिकमध्ये गुंतले होते. याचे काम पूर्ण झाल्यानंतर ते पटाखाचे चित्रीकरण सुरू करणार होते. खरं तर, ऑडीशन दिल्याच्या काही महिन्यापर्यंत सानंदला निवड झाल्याचे कळवण्यात आले नव्हते. नंतर जेव्हा इरफान खानची तब्येत बिगडल्यामुळे सपना दीदीला शिफ्ट करण्यात आले आणि पटाखाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. तेव्हा सानंदला कळवण्यात या चित्रपटात खलनायकाच्या साठी निवड झाल्याचे कळवण्यात आले. 

 

सानंद यापूर्वी अजयच्या रेडमध्येदेखील दिसला होता. यानंतर ते कार्तिक आर्यनच्या 'लुकाछुपी', सूरज पंचोलीच्या 'सॅटेलाइट शंकर' आणि आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. या तिन्ही चित्रपटा व्यतिरिक्त नील नितीन मुकेशच्या निर्मितीत बनत असलेल्या पहिल्या चित्रपटातदेखील काम करणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...