आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- अंनिसचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांचा खून झाल्यानंतर पाेलिसांकडून काेणताच तपास तातडीने सुरू झालेला नव्हता. मात्र, अर्ध्या तासातच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काहीच पुरावा हाती नसताना उजव्या विचारसणीच्या लाेकांचा यात सहभाग असल्याचे सांगत सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली. या वक्तव्यामुळे खरे मारेकरी पसार झाले व तपास यंत्रणाची दिशा भरकटत गेल्याचा आरोप सनातन संस्थेचे अधिवक्ता पराग गाेखले यांनी केला आहे.
पुराेगाम्यांच्या हत्या झाल्यावर निष्पाप हिंदुत्वनिष्ठांवर हाेणाऱ्या खाेट्या अाणि निराधार अाराेपांना विराेध करण्यासाठी तसेच सनातन संस्थेवरील बंदीच्या अन्यायी मागणीस विराेध करण्यासाठी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चाैक उद्यान ते कसबा गणपती मंदिरादरम्यान निषेध माेर्चाचे अायाेजन केले हाेते. त्याप्रसंगी माेर्चाच्या सांगता सभेत ते बाेलत हाेते.
गाेखले म्हणाले, विराेधकांचे विविध घाेटाळे सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीने उघडकीस अाणले अाहेत. त्यामुळेच सनातनवर बंदी घाला अथवा कारवार्इ करा, अशी मागणी पुरागाम्यांकडून सातत्याने केली जात अाहे. 'जवाब दाे' अांदाेलन करणाऱ्यांनीच अनेक प्रश्नांची उत्तरे समाजाला दिली पाहिजे. दाभाेलकर-पानसरे यांची हत्या एका पिस्तुलातून झाली हा अाराेप अनाठायी असून दाभाेलकरांचे पिस्तूल पाेलिसांनी जप्त केल्यावर त्याचा पुनर्वापर कसा हाेऊ शकेल. या सर्व प्रकरणात सनातन संस्था निर्दाेष असून संस्थेवर काेणतेही बिनबुडाचे अाराेप करू नयेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
विखे पाटलांचा घोटाळा समोर आणला म्हणून
विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना निळवंडे प्रकल्पातून शिर्डी संस्थानच्या माध्यमातून ५०० काेटी रुपये कसे मिळाले, ही बाब सनातन संस्थेने पाठपुरावा करून उघडकीस अाणल्याने त्यांच्याकडून संस्थेवर बंदीची मागणी केली जात अाहे. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वेगवेगळी भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणली. डाॅ. दाभाेलकर यांचे खरे मारेकरी शाेधा या मागणीपेक्षा ते सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी मागणी करत अाहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.