आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संदीप और पिंकी फरार'चा फर्स्ट लूक रिलीज, पूर्ण झाले 'बंटी और बबली 2'चे दुबई शेड्युल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राचा 'संदीप और पिंकी फरार' चित्रपट मागील एक वर्षापासून रखडला होता. हा चित्रपट येत्या 20 मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटातील अभिनेता अर्जुन आणि परिणीतीने सोशल मीडियावर त्यांचे लूक पोस्टर्स शेअर करताना दिली. यात ते दोघे गुन्हेगाराची भूमिका साकारत आहेत. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्या या ब्लॅक कॉमेडीत अर्जुन आणि परिणीती तिसऱ्यांदा एकत्र काम करत असून यापूर्वी या दोघांनी 'इश्कजादे' आणि 'नमस्ते इंग्लंड' मध्ये एकत्र काम केले आहे. हा चित्रपट मागील एक वर्षापासून तयार होता, परंतु बॉक्स ऑफिसवर निर्मात्यांना वाद नको होता म्हणून हा प्रदर्शित केला नव्हता.

'बंटी और बबली 2' चे अबू धाबीतील चित्रीकरण पूर्ण

सैफ अली खान आणि राणी मुखर्जीच्या 'बंटी और बबली 2' या चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपासून अब ूधाबीत सुरू होते, ते आता पूर्ण झाले आहे. चित्रपटात सैफ आणि राणी सोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरीही दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण व्ही. शर्मा आहेत, तर याची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 'बंटी और बबली'चा रिमेक असून तो यावर्षी 26 जून रोजी प्रदर्शित हाेईल.

बातम्या आणखी आहेत...