आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांसाठी मुलाने केला उमेदवारीचा त्याग, संदीप नाईकांनी घेतला मोठा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील ऐरोली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संदीप नाईक यांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. ऐरोलीमधून आता संदीप नाईकांऐवजी त्यांचे वडील गणेश नाईक निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजपने बेलापूर मतदारंसंघातून गणेश नाईकांना तिकीट न देता मंदा म्हात्रेना परत संधी दिली. त्यामुळे वडिलांसाठी मुलाने उमेदवारीचा त्याग केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ऐरोली मतदार संघातून भाजपने संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण, संदीप नाईकांऐवजी आथा गणेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आज दुपारी 3 वाजता या निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलं. तिकीट न मिळाल्यामुळे गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यामुळे, नाईक भाजप सोडण्याबाबत विचारात असल्याची चर्चा सुरू झाली. पण,  संदीप नाईक यांनी याबाबत खुलासा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...