आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sandya Pritam Pardesi About Ladies Toilet Issue In Aurangabad

महिला प्रसाधनगृहे हवीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद शहराचा विकास आणि व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. शहरात मॉल्स आणि दुकानांची संख्याही वाढली. त्यामुळे महिलावर्ग शॉपिंगसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतो. शॉपिंग आणि शहरातील वर्दळ यामुळे महिलांना बराच वेळ घराबाहेर राहावे लागते. यामुळे स्त्रियांची नैसर्गिक विधीसाठी कुचंबणा होते. पुरुषांची तशी गैरसोय होत नाही. या शहराच्या महापौर महिला असून नगरसेविकांचे प्रमाणही वाढलेले आहे. मात्र त्यांनी महिलांच्या या समस्येकडे लक्ष दिलेले दिसत नाही. शहरातील सर्व चौकांत महिलांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहे असावीत.
- संध्या प्रीतम परदेशी. औरंगाबाद