आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेर-रावेर बसला भीषण अपघात, चालक गंभीर; खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकची बसला धडक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर- संगमनेर-रावेर बसला शुक्रवारी (ता.1) भीषण अपघात झाला. रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात समोरुन येणार्‍या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली.  या अपघातात बस चालक आर.एच. आशिरवाड गंभीर जखमी झाला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, संगमनेर-रावेर बसला शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास विवरे-रावेरदरम्यान घडली. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रक थेट समोर येणार्‍या बसला धडकला. अपघातात चालक आशिरवाड गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी जळगावला रवाना करण्यात आले आहे. वाहक राठोड व एक प्रवाशी किरकोळ जखमी झाला. रावेर मार्गावरील खड्डे बुजणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...