आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील चार कलाकारांचा राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत गाैरव, राष्ट्रपती भवनात संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे वितरण 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना पुरस्कार देताना राष्ट्रपती.  - Divya Marathi
लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना पुरस्कार देताना राष्ट्रपती. 

नवी दिल्ली - प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबलावादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकारांना बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली. 

 

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात देशभरातील ४२ कलाकारांना वर्ष २०१७ चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा उपस्थित हाेते. १ लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी अभिराम भडकमकर यांना, तर नाट्य दिग्दर्शनातील योगदानासाठी सुनील शानबाग यांना सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध तबलावादक पंडित योगेश सामसी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी गाैरवण्यात अाले. लोककलेतील योगदानासाठी डॉ. खांडगे यांना सन्मानित केले. 

बातम्या आणखी आहेत...