आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीतील पूर तर ओसरायला लागला, मात्र सरकारी कामांवर संताप अनावर, जाणून घ्या काय म्हणताहेत सांगलीकर...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सांगलीत आलेल्या पुरानंतर तेथील पाण्याची पातळी किंचित कमी होत आहे. पाणी पूर्णपणे ओसरण्यासाठी आणखी 3 दिवस लागतील. पूर आल्यानंतर येथील नागरिकांची काय अवस्था होती. प्रशासनाशी संपर्क केला असताना त्यांना कसा प्रतिसाद मिळाला तो अनुभव स्थानिकांनी दिव्य मराठीचे प्रतिनिधी संजय चिंचोले यांच्यासमोर व्यक्त केला.

आपतकालीन पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाच्या आपात्कालीन यंत्रणेत समन्वय नव्हता. प्राथमिक सोयी सुविधा नव्हत्या. बोटी देखील नव्हत्या. प्रशासनाला पुराची गंभीरता कळाली नाही. जे काही आपत्कालीन संपर्क क्रमांक दिले होते ते लागत नव्हते. त्यामुळे लोकांची गैरसोय होत होती. -सचिन माळी


ज्यावेळी मुख्यमंत्रींचा कोल्हापुर दौरा झाला आणि प्रसार माध्यमांनी आवाज उठवला, त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडुन जागी झाली अन् सांगलीत आर्मी, नेव्ही, एन डी आर एफ, एस डी आर एफ यांच्या तुकड्या दाखल झाल्या. त्यानंतर खऱ्या  अर्थाने बचाव कार्यास सुरूवात झाली. -प्रदिप हवाने 

पूर जरी ओसरत असला तरी लोकांचे बचाव प्रशासनाला करता आला नाही अद्यापही आकाशवाणी, मौजे दिगार, पदमाळे, अंकली शिरोंळ, भिलवडी, ब्रम्हनाळ, अंकलखोप, औदुंबर, हरीपुर, नांद्रे वसगडे, येथील हजारो लोकांचा संपर्क तुटलेला आहे. -संजय चिकुर्डे

आपत कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुरग्रस्तांच्या क्षमतेनुसार बोटी उपलब्ध नसल्यानेच ब्रम्हनाळ सारखी स्थिती निर्माण झाली यात बारा लोकांचा बळी गेला. याला जबाबदार शासनाची आपतकालीन यंत्रणाच आहे. -माधुरी कोलप

समाजसेवक,सेवाभावी संस्था, खास करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन कल्याण समिती व समस्त सांगलीकर एक दुसर्याच्या मदतीला धावले. कॅम्प आयोजित केले. या लोकांचे काम वाखाणण्या जोगे आहे. त्यामुळे पुर ग्रस्तांना दिलासा मिळाला. -श्रीकांत उकिरडे

केडब्लुसी मध्ये जागा कमी पडल्याने आम्ही तातडीने पुर ग्रस्तांना चिंतामणी व्यापार महाविद्यालयात आणले प्रकाश नगर, कत्तलखाना, सीबीएस, हरिपुररोड, वखारभाग, गणेशनगर, फौजदार गल्ली, आलीशान चौक, भारतनगर, मुजावर प्लॉट, शास्त्री चौक, या भागातील दिड हजार लोकांची राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली. सोमवारी आणि मंगळवारी कुठलेही प्रशासन आले नव्हते. आम्ही स्वखर्चाने होड्या खरेदी करत तीनशे लोकांचे प्राण वाचवले नंतर प्रशासन कामाला लागले. -शुभम पाटील