आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीची खेळी; अहमदनगरमधून सुजय विखे यांच्या विरोधात संग्राम जगतापांना उमेदवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- अहमदनगरच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होऊन राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपूत्र सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दक्षिण अहमदनगरमधून कोणाला उमेदवारी द्यावी हा पेच राष्ट्रवादीसमोर होता, पण हाच पेच आता सुटला आहे. कारण, राष्ट्रवादीने अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांना सुजय यांच्या विरोधात लोगसभेच्या रिंगणात उतरवले आहे.

 

अहमदनगरच्या जागेसाठी अरूण जगताप आमि प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा होती, पण जगताप घराण हे पूर्वीपासूनच राष्ट्रवादीसोबत असल्याने त्यानं यावेळी संधी देण्यात आली. पण अरूण जगताप यांना उमेदवारी न देता त्यांचे पुत्र संग्राम जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे संग्राम कार्ड खेळून राष्ट्रवादीने भाजपला चांगलीच टक्कर दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...